Make papaya ubtan at home to get glowing skin tips marathi news
Make papaya ubtan at home to get glowing skin tips marathi news 
लाइफस्टाइल

"ग्‍लोइंग त्वचा मिळवण्यासाठी घरीच बनवा असे पपईचे उबटन"

अर्चना बनगे

कोल्हापूर: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कडक उन्हामुळे चेहऱ्याचा ग्लो गायब होऊन जातो. आर्टिफिशियल ग्लो परत मिळवण्यासाठी खूप महाग असे प्रॉडक्ट खरेदी करून आपण अनेक प्रयोग करतो. या दिवसांमध्ये बाजारात तुम्हाला पपई खूप सहज मिळते.  ही पपई खाण्याबरोबर चेहऱ्यावरती उबटनकरून लावू शकता. पपई आरोग्य आणि चेहरा दोन्ही साठी एक वरदानच आहे. घरच्या घरी तुम्ही पपईच्या खूप सोप्या स्टेप्स फॉलो करून उबटन तयार करू शकता. आणि चेहऱ्याला ग्लो पण आणू शकता.

असे बनवा पपईचे उबटन

दोन मोठा चमचा पपई

एक मोठा चमचा बेसन

एक मोठा चमचा मध

कृती

सगळ्यात पहिल्यांदा पपईला कट करून मॅश करून घ्या. यानंतर त्यामध्ये बेसन आणि मध घालून स्मूद पेस्ट  तयार करून द्या. या पेस्टला चेहऱ्याला सर्क्युलर मोशनमध्ये  लावून घ्या. यानंतर वीस मिनिटात चेहऱ्याला ते तसेच राहू द्या. वीस मिनिटानंतर परत एकदा हाताने सर्क्युलर मोशनमध्ये पूर्णपणे ते काढून टाका. आठवड्यातून एकदा वापरा.

काय होतात फायदे

1)एंटी-ऑक्‍सीडेंट्स  चे प्रमाण भरपूर अशा असलेल्या उबटनला चेहऱ्याला लावल्यानंतर चेहरा ग्‍लोइंग होऊन जातो. तुम्ही जर चेहऱ्यावरील पिंपल्सने त्रस्त असाल तर याचा उपयोग चेहरा चांगला बनवण्यासाठी होतो.
2)खूप सार्‍या महिलांच्या चेहऱ्यावरती केस असतात याला हटवण्यासाठी खूप प्रोडक्स आहेत .पण गरज नसलेले चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. पपई मध्ये पपैन नावाचे तत्व आहे जे केसांना लावल्यानंतर केस नष्ट होतात.

3)चेहऱ्यावरती जर सुरकुत्या, काळे डाग धब्बे असतील तर या उठल्याने  कमी करता येते. कारण यामध्ये विटामिन सी ची खूप मात्रा असते. जी त्वचेच्या मेलानिनचे प्रोडक्शन कमी करते.

4)उन्हा पासून होणारे टॅनिंग आणि सन बर्न करण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होतो. जर तुमच्या त्वचेवर पहिल्यापासूनच जर टॅनिंगअसेल तर ते कमी करण्यास देखील याचा उपयोग होतो.

उबटन लावून झाल्यानंतर हे काम करू नका
 
चेहऱ्याला साबणाचा वापर करू नये.
 पाण्याने चेहरा वॉश करा

उबटन लावल्यानंतर चेहऱ्याला वाळवून ठेवण्याची काही गरज नाही 20 ते 25 मिनिटे ठेवा आणि मसाज करुन त्याला काढून टाका.

हे लावल्यानंतर चेहऱ्याची मुमेंट खूप कमी करा. जर तुम्ही ते लावल्यानंतर जास्त बोलाल तर त्वचा ढिली पडू शकते.

चेहऱ्याला कोणत्याही  कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरू नका.
जर तुमची त्वचा खूप सेन्सिटिव्ह असेल तर स्किन पॅच टेस्ट करा.

डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT