लाइफस्टाइल

Weight Loss : नवीन वर्षात आहारात करा हे 4 बदल, झपाट्याने कमी होईल वजन

निरोगी राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी नवीन वर्षात तुमच्या आहारात काही बदल करायला हवेत.

Aishwarya Musale

नवीन वर्ष सुरू होणार आहे आपण सगळेच त्यासाठी काहीना नवीन वर्षाचे प्लॅन्स ठरवत असतो, येत्या वर्षात मी रोज व्यायाम करेल, रोज पुस्तकं वाचेल, दर आठवड्याला फॅमिली सोबत फिरायला जाईल, बाहेरच कमी खाईल, वजन कमी करेल हे आणि असे अनेक गोष्टी ठरवतो. निरोगी राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी नवीन वर्षात तुमच्या आहारात काही बदल करायला हवेत.

योग्य आहाराच्या मदतीने तुम्ही सहज वजन कमी करू शकता आणि निरोगी राहू शकता. त्याच वेळी, चुकीचा आहार रोग प्रतिकारशक्ती आणि पचन कमकुवत करू शकतो. वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या सूचनेनुसार नवीन वर्षात तुमच्या आहारात हे बदल करा. काही दिवसात तुम्ही सहज वजन कमी करू शकाल.

वजन कमी करण्यासाठी आहारात हे बदल करा

दिवसाची सुरुवात तुळशीच्या चहाने करा

तुळशीमध्ये औषधी गुणधर्म भरलेले आहेत. यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासून आराम तर मिळतोच शिवाय रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. तुळशी एक अनुकूलक औषधी वनस्पती आहे. हे स्ट्रेस आणि स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची पातळी कमी करते. तणावामुळे वजन कमी करणे देखील कठीण होते. अशा परिस्थितीत तुळशीचा चहा मदत करू शकतो.

प्रथिने युक्त नाश्ता करा

प्रथिनेयुक्त नाश्ता हे वजन कमी करण्याचे खरे रहस्य आहे. बरेचदा लोक वजन कमी करण्यासाठी नाश्ता सोडून देतात, पण आम्ही तुम्हाला सांगतो की वजन कमी करण्यासाठी तुम्ही पोटभर प्रोटीन युक्त नाश्ता केला पाहिजे. बेसन, मूग डाळ चीला, दलिया यासह अनेक गोष्टी नाश्त्यासाठी चांगला पर्याय असू शकतात. यामुळे चयापचय वाढतो आणि पोट भरल्यासारखे वाटते.

मेथी दाण्यांचा आहारात समावेश करा

मेथीच्या दाण्यांचा आहारात समावेश करा. यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.

क्रूसिफेरस भाज्या

क्रूसिफेरस भाज्या वजन कमी करण्यास आणि निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. यामध्ये असलेले घटक नैसर्गिकरित्या शरीराला डिटॉक्स करतात आणि यकृताच्या आरोग्यासाठी चांगले असतात. ब्रोकोली आणि फ्लॉवर सारख्या क्रूसिफेरस भाज्या आठवड्यातून दोनदा खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

BSNL Satellite Phone झाला लाँच! डोंगर, समुद्र, जंगलातही फुल्ल नेटवर्क; पूर, भूकंप, आपत्तीमध्येही संपर्क तुटणार नाही, किंमत फक्त...

Beed: घाटनांदूरमध्ये भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाला संपवले

SCROLL FOR NEXT