make your first valentine date memorable esakal
लाइफस्टाइल

पार्टनरसोबत पहिली डेट स्पेशल बनवायची? जाणून घ्या सोप्या टिप्स

जर तुम्ही व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पहिल्यांदाच एखाद्याला भेटत असाल तर दिलेल्या काही ट्रिक्समुळे तुमची भेट अविस्मरणीय होऊ शकते.

सकाळ वृत्तसेवा

जर तुम्ही व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पहिल्यांदाच एखाद्याला भेटत असाल तर दिलेल्या काही ट्रिक्समुळे तुमची भेट अविस्मरणीय होऊ शकते.

14 फेब्रुवारी रोजी साजरा होणारा व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) कपल्ससाठी खूप खास असतो. हा दिवस अधिक खास बनवण्यासाठी ते कपल्स किती दिवस आधीपासून प्लॅनिंग (Planning) करायला सुरुवात करतात ते कळत नाही. पण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही पहिल्यांदाच एखाद्या डेटवर भेटलात तर? अशावेळी थोडासा तरी संकोच मनात येतोच. जर तुम्ही व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पहिल्यांदाच एखाद्याला भेटत असाल तर दिलेल्या काही ट्रिक्समुळे तुमची भेट अविस्मरणीय होऊ शकते.

- लाल रंग हा प्रेमाचा रंग आहे. अशा परिस्थितीत तुम्ही त्या दिवशी लाल रंगाचे कपडे घालू शकता. तसेच, तुम्ही ज्यांना भेटणार आहात त्यांच्यासाठी तुम्ही गुलाबाचा पुष्पगुच्छ घेऊ शकता.

- पहिल्या भेटीत, लोक सहसा सुरवातीला बोलण्यास संकोच करतात. पण तुम्हाला हवे असल्यास, गुलाबांचे पुष्पगुच्छ पाहिल्यानंतर, तुम्ही त्यांना पुष्पगुच्छ कसा आवडला हे विचारू शकता. तसेच, जर तुम्ही त्यांना हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये भेटत असाल तर तुम्ही त्यांना ते ठिकाण कसे वाटले हे विचारू शकता.

- तुमच्या पार्टनरची निवड लक्षात घेऊन तुम्ही ऑर्डर द्या. तेथील वातावरण चांगले करण्यासाठी तुम्ही मध्येच एखादा विनोद किंवा शायरी म्हणू शकता, जेणेकरून वातावरणात कंटाळा येणार नाही.

- एखाद्याला ओळखण्यासाठी पहिल्यांदा त्या व्यक्तीचे मित्र असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही त्यांना त्यांचे विनोद, वीकेंडचे प्लॅन, त्यांचे काम, त्यांचे कुटुंब, त्यांचे मित्र इत्यादींबद्दल विचारून पुढाकार घेऊ शकता. याच्या मदतीने तुम्हाला मुलीची आवड आणि तिचा स्वभाव या दोन्ही गोष्टींची माहिती मिळेल.

- तुम्ही ज्याच्यासोबत डेटवर आला आहात त्या व्यक्तीच्या सुरक्षेची आणि आवडी-निवडीची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे हे लक्षात ठेवा.

तसेच, त्यांना आनंदी ठेवण्यासाठी, तुम्ही त्यांनी घातलेल्या कपड्यांचे, त्यांच्या शब्दांचे कौतुक करू शकता आणि जेव्हा तुम्ही घराकडे निघाल, तेव्हा तुम्ही पुढे कधी भेटू, असा प्रश्न विचारून तुम्ही पुढील प्लॅन करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

SCROLL FOR NEXT