how to refresh your mind and body
how to refresh your mind and body Esakal
लाइफस्टाइल

रोजच्या धावपळीतून स्वत:ला पूर्णपणे Refresh करायचंय, मग या ७ प्रकारे घ्या Rest आणि पहा कमाल

Kirti Wadkar

How to refresh your mind and body: रोजची कामं, अभ्यास भविष्यातील गोष्ट साध्य करण्यासाठी दररोज केली जाणारी धडपड यामुळे प्रत्येकजणच खूप थकून जातो. मानवी शरीराला Human Body विश्रांतीची आवश्यकता असते. अर्थातच यासाठी आपण नियमित झोपतो. Make yourself Refresh from Daily Routine

मात्र यामुळे तुम्हाला खरचं रिफ्रेश Rrefesh वाटतं का? अर्थात चोविस तासांमध्ये ७-८ तासांची चांगली झोप Sleep घेणं हे मानवी शरीरासाठी आवश्यक आहे. यामुळे शारीरीक थकवा आणि मरगळ दूर होते. मात्र याला आपण विश्रांती म्हणू शकतं नाही.

अलिकडे कामाचा, पैशांचा तसचं वाढती स्पर्धा अशा अनेक गोष्टींचा ताण प्रचंड वाढत चालला आहे. रात्री झोपतानाही आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा, समस्येचा विचार करतच झोपतो आणि सकाळ उजाडताच पुन्हा कामाची ओझी डोक्यावर घेऊन वावरतो.

यामुळेच आपल्याला शरीरासोबतच मानसिक, भावनिक आणि सामाजिक विश्रांती घेणं गरजेचं आहे. या विश्रांतीमुळे तुमचं शरीर, मन शांत होईल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने विश्रांती मिळेल. 

खऱ्या अर्थाने रिफ्रेश आणि ताजतवानं होण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची विश्रांती घेणं गरजेचं आहे ते पाहुयात. 

शारिरीक विश्रांती- दिवसभरातील कामांमुळे आपलं शरीर पूर्णपणे थकून गेलेलं असतं. यासाठी रात्रीची पुरेशी आणि शांत झोप घेणं गरजेचं आहे. यामुळे मरगळ दूर होते. तसचं गृहिणी देखील सकाळी उठल्यापासून अनेक कामांमध्ये व्यग्र असतात. अशात दुपारची वामकुक्षी घेतल्याने त्यांना रिफ्रेश वाटू शकतं.

दुपारी आराम करणं किंवा विश्रांती घेणं म्हणजे तासनतास झोपणं नव्हे. दुपारी जेवल्यावर जास्त वेळ झोपल्याने आजार वाढण्याची शक्यता असते. मात्र शरीराला काही वेळासाठी विश्रांती देणंही गरजेचं आहे. यासाठी तुम्ही जेवणानंतर डाव्या कुशीत १०-१५ मिनिटं डोळे बंद करून शांत एक डुलकी काढावी. यामुळे तुम्हाला ताजतवानं वाटेल. 

तसंच शारीरिक विश्रांची म्हणजे केवळ झोपणं नव्हे तर. शरीर रिलॅक्स करणं. यासाठी तुम्ही काही योगासन करू शकता किंवा चालायला जाणे स्ट्रेचिंग सारखा हलका व्यायाम केल्याने शरीरातील थकवा दूर होईल. 

हे देखिल वाचा-

मानसिक विश्रांती- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक विश्रांती एवढची प्रत्येकाला मानसिक विश्रांतीची गरज आहे. आपलं मन सतत कोणत्या ना कोणच्या विचारात गुंतलेलं असतं. यामुळे मनावर प्रचंड ताण येतो. भविष्यात याचे दुष्परिणाम दिसू लागतात. त्यामुळे नियमित मानसिक विश्रांती गरजेची आहे. 

मानसिक विश्रांतीसाठी तुम्ही ध्यानधारणा किंवा पुजापाठ करू शकता. मेडिटेशनमुळे मन एका गोष्टीवर एकाग्र केलं जातं. अशावेळी नको ते विचार दूर होतात आणि मन शांतं होतं. तसचं अनेकांना पूजापाठ करण्यानेही मानसिक शांती लाभते. 

यासोबतच मानसिक विश्रांतीचा सोपा आणि सुंदर पर्याय म्हणजे तुमचे छंद जोपासणं. स्वत:साठी वेळ काढून तुम्ही तुमचे छंद जोपासा. पेंटिंग, कुकिंग, बागकाम किंवा कलाकुसर यापैकी तुमच्या आवडीच्या कामामध्ये तुम्ही रमलात की इतर विचार दूर राहतात. यामुळे उलट तुम्हाला आनंद मिळतो. 

भावनिक विश्राती- माणूस हा एक भावनिक प्राणी आहे. आपल्या मनात अनेकदा अव्यक्त भावनांचं ओझं असतं. हे ओझ दमवून टाकणारं असतं. शिवाय अनेकदा या भावनिक ओझ्याचा मनावरही परिणाम होतो. यामुळे नैराश्य आणि चिंता वाढते. 

अनेकदा आपल्याला आपल्या मनाप्रमाणे वागता येत नाही. एखाद्यावरचा राग व्यक्त करता येत नाही. तर काही वेळेला मन मोकळं करून ढसाढसा रडण्याची इच्छा असताना इतरांसमोर ते करणं शक्य होतं नाही. या सर्व साचलेल्या भावनांना वाट मोकळी करून देणं गरजेचं आहे. 

यासाठी तुम्ही तुमच्या मनातल्या या भावना कागदावर उतरवू शकता. तुम्ही डायरी लिहू शकता किंवा बऱ्याचदा भावना कागदावर लिघल्यानं मन हलकं होतं. त्यामुळे तुम्ही नंतर ते कागद फाडून टाकू शकता. 

तसचं तुमची आवडती गाणी ऐकणं, कोडी सोडवणं या मार्गानेदेखील भावनिक विश्रांती घेणं शक्य आहे. 

सामाजिक विश्रांती- प्रत्येकाच्या आयुष्यात मी टाइम हा गरजेचा आहे. रोजच्या जिवनात, माणसांच्या गराड्यात, कुटुंबियांच्या आवडी निवडी जपण्यात आपण अनेकदा स्वत:साठी जगणं किंवा वेळ देणं विसरुन जातो. यामुळेही एकप्रकारच दडपण आणि मनावर थकवा येतो. हा थकवा दूर करणं गरजेचं आहे. 

यासाठीच लोकांच्या गर्दीपासून दूर स्वत:साठी वेळ काढा. एकांतामध्ये तुम्हाला हव्या असलेल्या आवडीच्या गोष्टी करा. एकांत म्हणजे एगदी खोलीत कोंडून घेणे नव्हे.

एकांत किंवा मी टाईम म्हणजे तुम्हाला तुमच्यासाठी हवं ते करणं. अशा वेळी तुम्ही तुमच्या सर्वात आवडत्या मित्र मैत्रिणीसोबतही वेळ घालवू शकता. त्यांच्याशी गुजगोष्टी करू शकता. 

या मी टाईममुळे तुम्ही रिफ्रेश व्हाल. भविष्यात तुम्हाला काय हवंय हे अनेकदा या मी टाइममध्ये लक्षात येतं. 

हे देखिल वाचा-

आध्यात्मिक साधना किंवा सेवेतून विश्रांती- पाठ पूजा, मंत्रपठण, ध्यान यामुळे सकारात्मकता वाढते. काही धार्मिक कार्यामुळे मन प्रसन्न राहतं. तुमची देवाववर श्रद्धा असले तर देवदर्शन किंवा एखाद्या धार्मिक कार्यात, प्रवचनात सहभागी व्हा. 

जरी तुमची देवावर श्रद्धा नसली तरी तुम्ही इतरांची सेवा करून मानसिक शांती मिळवू शकता. एखाद्या सेवाभावी संस्थेसोबत विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाल्याने, इतरांसाठी एखादं कार्य केल्याने अनेकदा मनाला शांती मिळते. यामुळे ऊर्जा वाढण्यास मदत होते. 

याशिवाय एखाद्या दिवशी फलाहार करून पचनेंद्रियांना विश्रांती देणंही तितकच गरजेचं आहे. तसचं गर्दी, प्रदूषण यापासून दूर २-४ दिवस निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवल्यानेही रिफ्रेश होण्यास मदत होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT