Mandukasana Benefits Sakal
लाइफस्टाइल

Mandukasana Benefits: मधुमेही रूग्णांसाठी मंडूकासन लाभदायी, जाणून घ्या करण्याची पद्धत अन् फायदे

Mandukasana Benefits: मधुमेहींनी नियमितपणे मंडूकासन केल्याने अनेक आजार दूर होतात.

सकाळ डिजिटल टीम

Mandukasana health benefits and steps read full story

आजकालच्या चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक गंभीर आजारांचा सामोरे जावे लागत आहे.

शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा करणे हा एक चांगला पर्याय आहे. योगा नियमित केल्याने शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

रोज योगा केल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. मंडूकासनाला इंग्रजीत 'Frog Pose' असेही म्हणतात. हा योगा करताना बेडकासारखी मुद्रा तयार होते.

मंडूकासन केल्याने पोटाचे स्नायू मजबूत होतात. तसेच पचनाच्या समस्यां असल्यास त्या देखील दूर होतात. मंडूकासन करण्यासाठी योग्य पद्धत आणि फायदे कोणते हे जाणून घेऊया.

मंडूकासन करण्याची योग्य पद्धत कोणती?

मांडूकासन करणे खूप सोपे आहे. हा योग प्रकार तुम्ही घरीही सहज करू शकता. हा योगा पुढील पद्धतीनुसार करावा.

मंडूकासन करण्यासाठी सर्वात पहिले वज्रासनात जमिनीवर बसावे.

मग आपल्या दोन्ही हाताच्या मुठी बंद करा. तुमचे अंगठे मुठीच्या आत असावेत.

नंतर तुमच्या दोन्ही मुठी नाभीच्या मध्यभागी ठेवा आणि दीर्घ श्वास घ्यावा.

नंतर श्वास सोडताना पुढे वाकून पोट आत ओढा.

आपली छाती आपल्या मांड्यांना स्पर्श करेल एवढे हळूहळू वाकावे.

काही वेळ या स्थितीत राहिल्यानंतर आपल्या पहिल्या स्थितीत परत या.

असे 4-5 वेळा करावे.

  • मंडूकासन केल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

मंडूकासन केल्याने पोटाचे स्नायू लवचिक होतात आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

मंडूकासनाचा नियमित सराव केल्याने गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

रोज सकाळी हा योगा केल्याने पोट व्यवस्थित साफ होते.

मंडूकासन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना खूप फायदा होतो. हा योगा नियमितपणे केल्याने शरीरात इन्सुलिनची निर्मिती योग्य प्रकारे होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

नाभी घसरण्याच्या बाबतीत मंडूकासन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे शरीरातील नसा त्यांच्या जागी परत येण्यास मदत होते.

मंडूकासन मूत्रपिंड आणि यकृताचे कार्य सुधारण्यास मदत करते. त्यामुळे किडनी आणि यकृत संबंधित आजार दूर राहतात.

हा योग प्रकार केल्याने गुडघ्याच्या सांध्याची लवचिकता आणि गतिशीलता सुधारते. त्यामुळे गुडघे मजबूत होतात.

मंडूकासन नियमित केल्याने महिलांना मासिक पाळीच्या वेदना आणि क्रॅम्पच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

तुम्ही जर अलिकडेच योगासन करायला सुरूवात केली असेल तर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT