nails cuticles
nails cuticles esakal
लाइफस्टाइल

नखांचे क्युटिकल कापणे ठरू शकते धोकादायक!

सकाळ डिजिटल टीम

घरी मॅनिक्युअर (manicure) वापरताना आपण कदाचित क्युटिकल्स (cuticles) कट करण्याचा विचार करत असाल, परंतु थांबा. कटिकल्स ट्रिम करणे किंवा तोडणे कोणत्याही प्रकारे योग्य नाही. आपण हे केल्यास, यामुळे आपल्याला वेदना होऊ शकतात, तसेच आपल्याला इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. (cuticles care lifestyle marathi news)

क्युटिकल्स म्हणजे नखांच्या मुळाशी असलेले टिश्यूज. नखांच्या मुळांचे रक्षण करण्यासाठी हे क्युटिकल्स खूप महत्त्वाचे असतात. क्युटिकल्स कापून टाकल्यास नखांना इनफेक्शन होण्याची अथवा जखम होण्याची शक्यता वाढते. यासाठीच क्लिपरच्या मदतीने नखांचे क्युटिकल्स सरसकट कापून टाकू नका. नखांवर मॉईस्चराईझर लावून तुम्ही कठीण झालेले क्युटिकल्स मऊ करू शकता. कारण क्युटिकल्समुळे तुमच्या नखांचे संरक्षण होत असते.

क्युटिकलला कमीत कमी धक्का लावणे आणि ते कमीत कमी मागे सारणे महत्त्वाचे असते. क्युटिकल कधीही कापू नये, त्यामुळे नखाची हानी होऊ शकते. नखामधल्या मृतपेशी आणि त्याखालचे नखाचे मूळ म्हणजे मॅट्रिक्स यामधल्या भागाचे संरक्षण करण्यासाठी क्युटिकलची योजना असते आणि म्हणून नखांइतकेच तेही महत्त्वाचे असते. खूप क्युटिकल काढले तर नखे ठिसूळ, वाकडी-तिकडी, नीट न वाढणारी, सालं जाणारी, कंगोरे असलेली अशी होऊ शकतात. क्युटिकलची काळजी घेण्यासाठी दिवसातून दोनदा तरी त्याला मॉइश्चरायझर लावावे. उन्हात जाणे जास्त असेल तर, सनस्क्रिन असलेले मॉइश्चरायझर वापरावे. क्युटिकल काढण्यासाठी क्युटिकल रीमूव्हर मिळते. यात सर्वसाधारणपणे खोबरेल तेल, पोटॅशियम फॉस्फेट, पोटॅशियम हायड्रॉक्साइड आणि पाणी तसेच ट्रायइथॅनोलॅमाईन यांचा समावेश असतो. या रसायनांची अ‍ॅलर्जी येऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT