Decor Tips बनवा घर सुंदर
Decor Tips बनवा घर सुंदर Esakal
लाइफस्टाइल

Decor Tips: या सोप्प्या टिप्सच्या मदतीने घर बनवा सुंदर, पाहुणे होतील थक्क

Kirti Wadkar

Decor Tips आपलं घरं सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. मात्र घर सुंदर दिसण्यासाठी ते मोठं असावं किंवा त्यासाठी महागडं इंटेरियर करावं लागेल असा अनेकांचा समज असतो. मात्र खरं तर घर सजवणं ही एक कला आहे. Marathi Home Decor Tips how to give new look to your home

त्यासाठी घरं किती मोठं आहे किंवा तुम्ही किती पैसा खर्च करताय, या पेक्षा तुम्ही ते कौशल्याचा Skills वापर करून कसं सजवताय हे गरजेचं आहे. खास करून अलिकडे शहरी भागांमध्ये जागेच्या कमतरतेमुळे घर सजवणं एक मोठी अडचण असते.

त्यामुळे लहान घर नेमकं कसं सजवावं Home Decor, शिवाय ते सजवत असताना सुटसुटीत दिसेल यासाठी काय नियोजन करावं असा प्रश्न अनेकांना पडतो.

यासाठीच आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला लहान घरंही अगदी कमी खर्चात सजवणं सोप्प होईल.

जर तुम्ही एखादं नवं घर खरेदी केलं असेल किंवा तुम्हाला घर सजवायचं असेल, मात्र जागेची कमतरता आहे. शिवाय तुम्हाला घरात फारशी अडचण नको. तसंच कमीत कमी पैसे खर्च करायचे आहेत; तर चिंता करण्याचं कारण नाही. कारण मोठ्या घरापेक्षा लहान घर सजवणं हे जास्त सोपं ठरतं.

योग्य रंगांची निवड गरजेची

लहान घर सजवत असताना घरासाठी कायम फिक्या रंगांची निवड करा. फिक्या रंगांमुळे घरामध्ये पुरेसा उजेड राहतो आणि घर मोठं दिसू लागतं. यासाठी घराच्या भिंती या पांढऱ्या, फिक्या गुलाबी, फिक्या पिवळ्या, आकाशी किंवा सिल्वर टोन असलेल्या असाव्या.

भिंतींच्या रंगांसोबतच खिडक्यांसाठी लावण्यात येणारी पडदे Curtains देखील फिक्या रंगाचे असावेत. तसंच फर्निचर किंवा बेडकव्हर देखील फिक्या रंगाच्या निवडा. यावर तुम्ही काही निळ्य़ा, राखाडी अशा गडद रंगाच्या छोट्या उश्या किंवा कुशन ठेवून त्याची शोभा वाढवू शकता.

हे देखिल वाचा -

फर्निचरची निवड

जर तुमचं घर लहान असेल आणि तुम्हाला ते सजवत असताना फर्निचर कुठे ठेवावं आणि सामान कसं लावावं असा प्रश्न पडला असेल तर चिंता करण्याची गरज नाही. यासाठी केवळ योग्य फर्निचरची निवड करणं गरजेचं आहे. तुम्ही सोफा कम बेड, पुल आउट टेबल किंवा फोल्डिंग चेअर अशा फर्निचरचा पर्याय निवडू शकता.

तसंच टीव्हीसाठी कॅबिनेट न बनवता टीव्ही वॉल माऊंट करून त्या शेजारी दोन साधे शेल्फ बसवू शकता. यावर तुम्ही काही पुस्तकं किंवा शोभेच्या वस्तू ठेवू शकता. सोफा, बेटमध्ये स्टोअरेज असेल याची काळजी घ्या. ज्यामुळे अतिरिक्त वस्तू त्यात ठेवता येतील.

तसंच घराच्या काही कोपऱ्यांमध्ये शोभेचं एखादं झाडं किंवा लॅम्प ठेवल्याने देखील घर सुंदर दिसू लागेल. घर सजवण्यासाठी लहान लहानन शोभेची रोपं हा एक चांगला पर्याय असल्याने तुम्ही लिव्हिंग रुममध्ये ३-४ लहान आकाराची शोभेची रोपं ठेवून घर सजवू शकता.

आरसे लावून घराची शोभा वाढवा

आरशामुळे घरं मोठं दिसण्यास मदत होते. यासाठीच तुम्ही लिव्हिंग रुममधील एखाद्या भिंतीला मोठा आरसा बसवू शकता. तसचं घराच्या पेसेजमध्ये देखील आरशामुळे चांगला लूक येतो. यामुळे घर प्रशस्त दिसण्यास मदत होते.

अशा प्रकारे काही सोप्प्या टिप्सच्या मदतीने तुम्ही घरच्या घरीचं तुमचं घर सुशोभित करू शकता.

हे देखिल वाचा -

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT