किचनची स्वच्छता
किचनची स्वच्छता Esakal
लाइफस्टाइल

Kitchen Cleaning Hacks मायक्रोवेव्ह, किचन ओटा ठेवा नव्यासारखा स्वच्छ

Kirti Wadkar

आपल्या घरातील सगळ्यात महत्वाची जागा म्हणजे आपलं स्वयंपाकघर. इथं आपण आपला रोजचा स्वयंपाक करत असतो. अनेक महिलांचा दिवसभरातील जास्त वेळ हा तर स्वयंपाक करण्यात आणि त्यानंतर स्वयंपाकघर Kitchen आवरण्यातच जातो. Marathi Kitchen Hacks Remove Oil Stens from your kitchen

स्वयंपाक Cooking करण्यासाठी स्वयंपाक घर स्वच्छ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक कारणं महत्वाची आहेत. तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ असेल तर स्वयंपाक Cooking करताना स्वच्छता राखली जाईल.

यामुळे घरात झुरळं, उंदीर किंवा मुंग्या होणार नाहीत. स्वयंपाक करण्यासाठी मन प्रसन्न राहिल. तसचं स्वयंपाकघरात Kitchen दररोज स्वयंपाक करून तेलाचा आणि इतर पदार्थांचा अनेकदा ओट्यावर आणि टाईल्सवर थर साचतो यामुळे बॅक्टेरीया वाढण्याची शक्यता असते यासाठीच स्वयंपाक घर स्वच्छ ठेवावं.

खरं तर स्वयंपाक झाल्यानंतर महिला किंवा स्वयंपाक करणारे अनेकजण गॅसची शेगडी, ओटा स्वच्छ करत असतात. दररोज भांडी घासली जातात. बेसिन धुतलं जातं. मात्र रोजच्या कामाच्या गडबडीत किचनीची डीप क्लिनिंग राहते.

वरचेवर किचन स्वच्छ केल्याने बऱ्याचदा भिंतीवरील फरश्या, बेसिनचे कोपरे, शेगडीची मागील आणि खालील बाजू तसचं एक्झॉस्ट फॅन अशा अनेक वस्तूंवर तेलकट थर आणि घाण साचते. यासाठी डीप क्लिनिंग गरजेची असते. आम्ही दिलेल्या काही टिप्सच्या मदतीने तुम्ही स्वयंपाक घराची डिप क्लिलिंग करू शकता.

विनेगरच्या मदतीने स्वच्छता- विनेगर हे तुमच्या स्वयंपाक घरातील बॅक्टेरीया नष्ट करण्यासाठी एक प्रभावी साधन आहे. सेलिन किंवा सिंक स्वच्छ करण्यासाठी तुम्ही तुम्ही विनेगरचा वापर करू शकता. यासाठी एका बाटलीमध्ये अर्धा कप विनेगर आणि गरम पाणी भरा.

आता हे पाणी सिंकमध्ये सर्वत्र टाका आणि १५ मिनिटं राहू द्या. १५ मिनिटांनी ब्रशच्या मदतीने सिंक आणि आजूबाजूचा भाग स्वच्छ घासून धुवा. मुळे सिंक स्वच्छ तर होईलच शिवाय यामुळे बॅक्टेरियाचा नायनाट होईल.

हे देखिल वाचा-

तुम्ही किचन कॅबिनेट्स स्वच्छ करण्यासाठी देखील विनेगरचा वापर करू शकता. यामुळे झुरळांचा बंदोबस्त होण्यास मदत होईल. यासाठी एका बाटलीमध्ये विनेगर आणि लिंबाच्या रसाचं मिश्रण भरा. किचन किबिनेट् किंवा ट्रालीमध्ये हा स्प्रे मारून १५-२० मिनिटं राहू द्या त्यानंतर एखाद्या कोरड्या कापडाने स्प्रे केलेली जागा पुसून घ्या. विनेगरच्या उग्र वासाने झुरळ आणि पालींचा बंदोबस्त होईल.

बेकिंग सोड्याच्या मदतीने स्वच्छता- किचनमधील चिकटपणा आणि डाग दूर करण्यासाठी बेकिंग सोडा हा एक उत्तम पर्याय आहे. बेकिंग सोडाच्या मदतीने तुम्ही किचनमधील अनेक वस्तू स्वच्छ करू शकता. किचनमध्ये सतत स्वयंपाक केल्याने किचनच्या फरश्यांवर चिकट आणि तेलकट थर साचतो.

फरश्यांवरील चिकट थर दूर कऱण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये विनेगर बेकिंग सोडा आणि थोडं लिक्विड डिटर्जंट मिसळा. यात थोड पाणी भरून किचनच्या फरश्या वर स्प्रे करा. १०.१५ मिनिटांना एका ब्रशच्या मदतीने स्क्रब करून स्वच्छ कापडाने किंवा पाण्याने फरशी स्वच्छ करा. यामुळे फरशी नव्या प्रमाणे चमकू लागेल.

किचनमध्ये काहीवेळेस काही गंजाचे डाग फरशीवर राहतात. हे डाग दूर करण्यासाठी बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी बेकिंग सोड्यामध्ये लिंबाचा रस मिसळून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट गंज लागलेल्या ठिकाणी लावा. थोड्या वेळाने एका ब्रशच्या मदतीने हे डाग घासल्यास सहन निघतील.

अशी स्वच्छ करा किचनमधील काचेची खिडकी आणि भांडी

किचनमधील खिडकिच्या काचा असो किंवा भांडी Utensils ही स्वच्छ करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये ५० टक्के विनेगर आणि ५० टक्के पाणी भरा. आता हा स्प्रे खिडकीच्या काचा किंवा काचेच्या बरण्या किंवा इतर भांड्यांवर मारा. त्यानंतर टिश्यू पेपर किंवा न्यूज पेपरच्या मदतीने स्वच्छ पुसा. यामुळे काचा आणि काचेची भांडी चमकू लागतील.

गॅस शेगडी आणि मिक्सर स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही गॅसची शेगडी नियमितपणे स्वच्छ करत असलात तरी या शेगडीच्या कोपऱ्यांमध्ये अनेकदा घाण साचते. तसचं मिक्सरच्या Mixer मध्येही कोपऱ्यामध्ये घाण साचलेली असते. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये कोमट पाणी आणि लिक्विड डिटर्जंटचे काही थेंब टाका. तसंच एक चमचा विनेगर टाका. त्यानंतर संपूर्ण शेगडीवर खास करून कोपऱ्यांमध्ये स्प्रे करा.

स्क्रबच्या मदतीने शेगडी चांगली घासून घ्या. त्यानंतर एखाद्या जुन्या टुथब्रशच्या मदतीने शेगडीचे तसचे मिक्सरचे कोपरे स्वच्छ करा. त्यानंतर स्वच्छ कापडाने शेगडी पुसून घ्या. पुन्हा एक किंवा दोन वेळा कापडं पाण्यात स्वच्छ करून शेगडी आणि मिक्सर स्वच्छ करा. यामुळे तुमची शेगडी नव्या सारखी चमकू लागेल.

हे देखिल वाचा-

असा स्वच्छ करा माइक्रोवेव

अनेकजण किचनमध्ये माइक्रोवेवचा वापर करतात. बाहेरून तर वरेचवर माइक्रोवेव स्वच्छ केलं जातं. मात्र आतून त्याकडे दुर्लक्ष होत. आतून माइक्रोवेव स्वच्छ करण्यासाठी तुम्हा अगदी सोपा उपाय करायचा आहे. यासाठी एका काचेच्या बाऊलमध्य पाणी घ्या यात थोडं विनेगर टाका.

विनेगर असलेलं हे पाणी माइक्रोवेवमध्ये २ मिनिटांसाठी गरम करा. त्यानंतर मायक्रोवेव बंद करा. यामुळे पाण्याची वाफ माइक्रोवेववर आतून पसरेल. १५ मिनिटांनी एका कापडाने माइक्रोवेव आतून स्वच्छ पुसून घ्यावं. यामुळे मायक्रोवेव आतून पूर्णपणे स्वच्छ होईल .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

राजापेक्षा प्रधान श्रीमंत! किंग चार्ल्स यांच्यापेक्षा ऋषी सुनक,पत्नी मूर्तींची संपत्ती जास्त

MS Dhoni RCB vs CSK : पराभवानंतर नाराज झालेल्या धोनीनं RCB खेळाडूंशी हस्तांदोलनही नाही केलं?

Amruta Khanvilkar: "आई किंवा बहिणीबरोबर फिरते पण नवऱ्यासोबत का फिरत नाहीस?", चाहतीचा प्रश्न; अमृतानं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

SCROLL FOR NEXT