TVs Apache RTR 160 4V 
लाइफस्टाइल

TVS Apache RTR 160 4V गाडी झाली महाग; जाणून घ्या कितीने वाढली किंमत

टीव्हीएस कंपनीने गेल्या काही महिन्यांमध्ये ही दुसरी वेळ असून TVs Apache RTR 160 4V गाडीची किंमत महाग केली आहे.

भूषण श्रीखंडे

जळगावः TVS मोटर कंपनीने आपल्या ग्राहकांना नुकत्याच दिलेल्या धक्क्यात टीव्हीस अपाचे आरटीआर १६० ४व्ही (TVs Apache RTR 160 4V) या गाडीची कंपनीने त्याची किंमत 4,250 रुपयांनी वाढवली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ही दुसरी वेळ आहे जेव्हा कंपनीने (TVs Company) त्याची किंमत महाग केली आहे. यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने त्याची किंमत 1,250 रुपयांनी वाढवली होती. चला तर जाणून घेवू या गाडीचे वैशिष्ट्य व किमंत..

TVs Apache RTR 160 4V

अशी आहेत नवीन किंमती

TVS अपाचे 160 4V नवीन किंमती अशी असून यात दोन प्रकार आहेत. ड्रम गाडीची जूनी किमंत १ लाख ७ हजार ३१५ हजार रुपये तर नविन किंमत १ लाख ११ हजार ५६५ तर डिस्क गाडी १ लाख १० हजार ३६५ जुनी किंमत तर नविन किंमत १ लाख १४ हजार ६१५ रुपये झाली असून ४ हजार २५० रुपयांनी गाडींच्या किंमतीत वाढ झाली आहे.

TVs Apache RTR 160 4V

अशी आहेत वैशिष्ट

या गाडिचे चे इंजिन 9,250 rpm वर 17.4 bhp ची जास्तीत जास्त पॉवर आणि 7250 rpm वर 14.73 Nm ची पीक टॉर्क जनरेट करते. तर इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशनला जोडलेले आहे. गाडीची 1050 मिमी लांबी, 2035 मिमी उंची आणि 790 मिमी उंची असून ग्राउंड क्लिअरन्स 180 मिमीची आहे. व व्हीलबेस 1357 मिमी आहे.

TVs Apache RTR 160 4V

इंधन टाकी, इंजिन

2021 TVS Apache RTR 160 4V मध्ये 12 लिटरची इंधन टाकी आहे. तर गाडीचे इंजन BS6 आहे. 159.7cc सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, 4-व्हॉल्व्ह, ऑइल-कूल्ड इंजिन आहे. तर डिस्क प्रकारच्या गाडीचे वजन 147 किलो आहे. व ड्रम ब्रेक प्रकाराचे वजन 145 किलो आहे.

असे आहेत फिचर्स
या गाडीला टेलिस्कोपिक काटे आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेंशन आहे. समोर 270 मिमी स्टील डिस्क ब्रेक आहे. त्याच वेळी, त्याच्या मागील बाजूस 200 मिमी पेटल डिस्क ब्रेक किंवा 130 मिमी ड्रम ब्रेक निवडण्याचा पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Rohit Pawar: अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा; तर सरकाला श्वास घेणेही घेणे अवघड होईल, आमदार रोहित पवार....

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT