Stylish Look दुपट्टा ड्रेसिंग Easakal
लाइफस्टाइल

Stylish Looks साठी या स्टाइलने दुप्पटा करा ड्रेप, हटके लूकचं सगळेच करतील कौतूक

जर तुम्हाला देखील दिवाळीमध्ये वेगवेगळे लूक ट्राय करायचे असतील तर आम्ही तुम्हाला दुप्पट्टा ड्रेप करण्याचे काही स्टायलिश पर्याय सांगणार आहोत

Kirti Wadkar

सणासुदीचे दिवस म्हटलं की नवे कपडे, नवे दागिने घालून नटण्या थटण्याची महिला वर्गाला मोठी हौस असते. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळी म्हटली की तीन-चार दिवस मोठ्या उत्साहाचे आणि आनंदाचे असतात.

कुटुंबासोबत एकत्र येत तसंच मित्र मैत्रिणींसोबत मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. दिवाळीतील Diwali Festival भेटी गाठी असो किंवा दिवाळी पार्टी, सुंदर तयार होऊन जायला कुणाला आवडत नाही.

दिवाळीसाठी नेमके काय कपडे Clothing घालायचे याची तयारी आठवडाभर आधीपासून सुरु होते. आपला लूक Stylish Look हटके आणि सुंदर असावा असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. दिवाळीसाठी सलवार सूट खरेदी करताना देखील खास लक्ष दिलं जातं. Marathi Style and fashion tips draping for dupatta for women

जर तुम्हाला देखील दिवाळीमध्ये वेगवेगळे लूक ट्राय करायचे असतील तर आम्ही तुम्हाला दुप्पट्टा ड्रेप करण्याचे काही स्टायलिश पर्याय सांगणार आहोत. लेहंगा किंवा सलवार सूटचा दुप्पटा नेहमीपेक्षा काहीशा वेगळ्या स्टाइलने जर तुम्ही ड्रेप केलात तर तुमचा लूक अधिक खुलून दिसू शकतो. तसंच तुम्ही दुप्पटा किंवा ओढणीच्या वेगवेगळ्या स्टाइल ट्राय करून तुमच्या जुन्या ड्रेसला नवा लूक देऊ शकता.

केप स्टाइल

केप स्टाइल दुप्पटा ड्रेपिंग हे सध्या ट्रेंण्डमध्ये आहे. अशा प्रकारच्या स्टाइलने तुमचा लूक हटके दिसेल. शिवाय वारंवार दुपट्टा अॅडजेस्ट करण्याची देखील गरज भासणार नाही. यासाठी ओढणीच्या दोन्ही शेवटाकडील वरील टोकांना एक सेफ्टीपिन लावा. त्यानंतर जॅकेटप्रमाणे ही ओढणी गळ्यात घाला.

या प्रकारे तुम्ही एखादा ओव्हरकोट किंवा शर्ट घातल्याप्रमाणे ओढणीचा लूक येईल. एखाद्या प्लेन जुन्या ड्रेसवर तुम्ही कॉन्ट्रास रंगाची ओढणी केप स्टाइलने ड्रेप करून हटके लूक तयार करू शकता.

वन साइड दुप्पटा

जर तुमची ओढणी किंवा दुप्पटा हा हेवी किंवा भरजरी असेल तर तुम्ही केवळ एका बाजूला संपूर्ण हातावर ही ओढणी घेऊ शकता. ज्यामुळे दुप्पट्ट्यावरील नक्षी किंवा डिझाइन उठून दिसेल. दुप्पटा पुढे मागे सरकू नये म्हणून तुम्ही दुप्पट्याला मध्यभागी खांद्याजवळ सेफ्टीपीन लावू शकता.

दुप्पटा विथ बेल्ट

साडी किंवा ओढणीच्यावर बेल्ट लावून तुम्ही खास लूक तयार करू शकता. सध्या ट्रेंण्ड चांगलाच पाहायला मिळतोय. यामध्ये तुम्ही केप स्टाइलप्रमाणेच दुप्पटा घेऊन त्यावरून एखादा गोल्डन किंवा प्लेट बेल्टही लावू शकता. यामुळे तुमच्या ड्रेसचा संपूर्ण लूक बदलून जाईल.

तसंच ओढणी गळ्यामध्ये एखाद्या अॅप्रनसारखी बांघून तुम्ही त्यावर बेल्ट लावू शकता. हा इंडो वेस्टर्न लूक नक्कीच अनेकांचं लक्ष वेधून घेईल.

हे देखिल वाचा-

प्रिसेंस बो

जर तुम्हाला क्लासी लूक हवा असेल तर तुम्ही लेहंगा किंवा ड्रेसची ओढणी प्रिसेंस बो स्टाइलने ड्रेप करू शकता. यासाठी ओढणी दोन्ही हातांवरून घेऊन पाठीच्या बाजूला बो स्टाइलने गाठ बांधा. यामुळे तुमच्या ड्रेसचा लूक हटके दिसेल.

डबल दुप्पटा

तुम्ही तुमच्या लेहंग्यावर दोन ओढण्यांच्या मदतीने एक हटके लूक तयार करू शकता. यासाठी दुप्पट्ट्याच्या निऱ्या करून घ्या. दोन्ही खांद्यावर वेगवेगळे दुप्पटे घ्या. त्यानंतर ओढणीच्या मागील दोन टोकं एकमेकांनी पीन करा. तुम्ही यावर एखादा सुंदरसा बेल्टही लावू शकता.

अशा प्रकारे केवळ ओढणीची ड्रेपींग स्टाइल बदलून तुम्ही फेस्टिव्हल सिझनसाठी विविध लूक तयार करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ODI World Cup 2025 Live Streaming: भारतात सुरू होतोय १२ वर्षांनंतर वर्ल्ड कपचा थरार! कुठे पाहाणार सामने? जाणून घ्या एका क्लिकवर

Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ स्विर्झलंडमध्ये; ९० दिवसांचा मिळवला व्हिसा

lioness guard VIDEO : नवरात्रोत्सवात देवीच्या मंदिरासमोर चक्क सिंहिणीचा पहारा!

IND vs WI: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विंडीजला आणखी दुसरा मोठा धक्का; टीममध्ये केला बदल

२ तारखेला सोलापूर शहरातील वाहतूक मार्गात बदल! विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनी पारंपारिक वाद्याच्या गजरात निघणार मिरवणुका; ‘डीजे’ला बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT