Margashirsha Amavasya esakal
लाइफस्टाइल

Margashirsha Amavasya : मार्गशीर्षातील शेवटच्या गुरूवारावर आमावस्येचं सावट? व्रत करावं की नाही?

आमावस्येदिवशी पुजेची मांडणी कधी करावी?

Pooja Karande-Kadam

Margashirsha Amavasya :

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला जसे महत्त्व आहे. तसेच मार्गशिर्ष महिन्यालाही आहे. मार्गशीर्षातील व्रत-वैकल्य केल्याने पुण्य मिळते अशी धारणा आहे. त्यामुळे महिला वर्ग या महिन्यातील व्रत करतातच. यंदाच्या मार्गशीर्षाबाबत महिलांच्या मनात साशंकता आहे. कारण योगच तसा जुळून आला आहे.

यंदाच्या मार्गशीर्ष महिन्यात गुरूवार किती आहेत याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. दोनच दिवसात मार्गशीर्ष महिना संपणार आहे. मराठी कॅलेंडरनूसार दर आमावस्येला एका महिन्याचा शेवट होतो. तसाच मार्गशीर्षातील आमावस्येला हा महिना संपणार आहे. (Margshirsha Mahina Amavasya)    

त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरूवारी लक्ष्मी मातेची पूजा करायची की नाही, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. त्यामुळे, आमावस्या कधी सुरू होईल, गुरूवारची पूजा, व्रत करायचे की नाही,याबद्दल ज्योतिष शास्त्र काय म्हणते ते पाहुयात. (Margashirsha Vrat Pujan)

पंचांगानुसार 12 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरूवात झाली आहे. जानेवारीतील आमावस्या ही बुधवारी रात्री 8 वाजून 11 मिनिटांनी लागणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरूवारी 11 जानेवारीला सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी संपणार आहे.

दिवाळीमध्ये येणारं लक्ष्मीपूजन हे आमावस्येदिवशीच असतं. त्यामुळे केवळ आमावस्या आहे म्हणून व्रत करणं शूभ मानलं जाणार नाही, असं नाही. तर त्या दिवशी व्रत करून देवीच्या पूजेची मांडणीही करा. तसेच, काही महिला या दिवशी व्रताचे उद्यापनही करतात.  

मुहूर्त

अनेक स्त्रिया लक्ष्मीमातेच्या पूजेची मांडणी सकाळीच करून कथा वाचून घेतात. पण काही स्त्रिया गोरज मुहूर्तावर पूजा मांडतात. आमावस्या संपण्याची वेळ ही ५ वाजून २७ मिनिटांची आहे, त्यामुळे त्या दिवशी साडेपाच वाजण्याच्या आधी पूजेची मांडणी करून कथेच वाचनही करून घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT