Margashirsha Mahina  esakal
लाइफस्टाइल

Margashirsha Mahina : मार्गशिर्षातील प्रत्येक गुरूवार आहे खास, जाणून घ्या या दिवशी काय करावं, काय नाही?

स्त्री आणि पुरुष दोघांनाही गुरूवारी केस कापू नयेत? असं का म्हटलं जातं

Pooja Karande-Kadam

Margashirsha Mahina :

हिंदू धर्मात प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे. कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित आहे, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे. 

कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो. हिंदू कॅलेंडरनुसार हा नववा महिना आहे. गितेत श्रीकृष्णाने मार्गशीर्ष महिन्याचे स्वतःचे रूप सांगितले आहे. कारण श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे अवतार आहेत आणि नारायणाची पूजा माता लक्ष्मीशिवाय अपूर्ण मानली जाते. या दृष्टीकोनातून पाहिले तर मार्गशीर्ष महिना श्री हरी आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. 

गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. त्या दृष्टीने या महिन्यातील गुरुवार अतिशय विशेष मानला जातो. गुरूवारी माता लक्ष्मी यथासांग पूजा मांडून तिच्या कथेचे वाचनही केले जाते. मार्गशीर्ष महिन्यात नारायण आणि लक्ष्मीचे व्रत केल्याने धन-धान्याची कमतरता कधीही भासत नाही अशी मान्यता आहे. 

मार्गशिर्षातील प्रत्येक गुरूवारी काय करावे?

जर तुम्ही गुरुवारी व्रत करू शकत नसाल तर सत्यनारायण की कथा किंवा गुरुवार व्रत कथा जरूर वाचा. यामुळे जीवनात आनंद टिकून राहतो. 

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मी आणि नारायण यांच्या मूर्ती एकत्र ठेवाव्यात. भगवंतांना गूळ आणि फुटाण्यांचा नैवेद्य अर्पण करा आणि देवी लक्ष्मीला खीर किंवा दुधाची कोणतीही वस्तू अर्पण करा.

या दिवशी मंदिरात गहू आणि गूळ दान करणे चांगले मानले जाते. मार्गशीर्ष महिन्यात दानाचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. असे म्हटले जाते की यामुळे घरातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.

गुरुवारी गूळ, हरभरा डाळ आणि हळद मिसळून गाईला खाऊ घातल्यास श्री हरीची विशेष आशीर्वाद प्राप्त होते. गायीला तिलक लावून तिची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा असेही सांगितले जाते.

जर तुम्हाला काही शुभ कार्य सुरू करायचे असेल तर गुरुवार हा दिवस खूप चांगला मानला जातो. त्याच वेळी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अधिक चांगला आहे. असे म्हणतात की यामुळे घरामध्ये शुभ कार्यांची पुनरावृत्ती होते.

चुकूनही या गोष्टी करू नका

  1. गुरुवारी केस धुण्यास मनाई आहे. असे म्हणतात की यामुळे संपत्ती आणि समृद्धी कमी होते.

  2. असे म्हटले जाते की या दिवशी नखे कापल्याने घरात नकारात्मकता येते. त्यामुळे नखे कापणे टाळा. 

  3. या दिवशी स्त्री आणि पुरुष दोघांनाही केस कापण्यास मनाई आहे. यामुळे गुरू कमजोर होतो आणि प्रगतीत अडथळे निर्माण होतात.

  4. असे म्हणतात की गुरुवारी धोब्याला कपडे धुण्यास किंवा इस्त्री करण्यास देऊ नका. यामुळे घरात गरिबी येते.  

  5. तसेच गुरूवारी कोणालाही उद्धट बोलू नका, तसेच कोणाशी भांडणही काढू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: होमगार्ड तरुणीचा खून मैत्रिणीकडून,मृतदेह फेकण्यासाठी घेतली मुलाची मदत

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT