Aadhar google
लाइफस्टाइल

मास्क्ड आधार म्हणजे नेमकं काय ? ते कसं वापराल

आता भारत सरकारने आधार कार्ड डाउनलोडबाबत अलर्ट जारी केला आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, लोकांना फक्त मास्क्ड आधार शेअर करण्यास सांगितले आहे.

नमिता धुरी

मुंबई : आजच्या काळात आधार कार्ड आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. आधार कार्डाशिवाय तुम्ही बँक खाते उघडू शकत नाही किंवा नोकरीही मिळवू शकत नाही. हॉटेलमध्ये रूम मिळवण्यासाठीही आधी आधार कार्ड द्यावे लागते. आता भारत सरकारने आधार कार्ड डाउनलोडबाबत अलर्ट जारी केला आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, लोकांना फक्त मास्क्ड आधार शेअर करण्यास सांगितले आहे.

वास्तविक, सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वांत सांगितले आहे की, लोकांनी कोणत्याही कामासाठी आधार कार्डची फोटोकॉपी कुठेही देऊ नये, कारण काही लोकांकडून त्याचा गैरवापर होऊ शकतो. तुम्ही फोटोकॉपी ऐवजी मास्क केलेले आधार कार्ड देऊ शकता, जेणेकरून तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही.

मास्क आधारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात तुमचा पूर्ण १२ अंकी आधार क्रमांक दिसत नाही. आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे ४ अंक दिसत आहेत. हे लोकांना तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करण्यापासून रोखते. तुम्ही ते ऑनलाइन डाउनलोड करू शकता.

तुमचे मास्क्ड आधार कार्ड कसे डाउनलोड कराल ?

सर्व प्रथम https://eaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करा.

आता मेनूमधून 'आधार' हा पर्याय निवडा.

'आधार कार्ड डाउनलोड' या पर्यायावर क्लिक करा.

आता मास्क आधार कार्ड निवडा.

आता कॅप्चा कोड प्रविष्ट करा जो सत्यापनासाठी प्रदान केला जाईल.

'ओटीपी पाठवा' या पर्यायावर क्लिक करा.

मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी OTP क्रमांक टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT