Maternity Leaves: Sakal
लाइफस्टाइल

Maternity Leaves: सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; सरोगेट मातांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Maternity Leaves: आता सरोगसीद्वारे माता बनणाऱ्या महिलांनाही १८० दिवसांची प्रसूती रजा मिळणार आहे.

Puja Bonkile

Maternity Leaves: भारत सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा बदल केला आहे. आता सरोगसीद्वारे माता बनणाऱ्या महिलांनाही १८० दिवसांची प्रसूती रजा मिळणार आहे. केंद्रीय नागरी सेवा नियम, २०२४ जारी करून सरकारने हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. दोनपेक्षा कमी मुले असतील तरच त्यांना या नियमाचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे.

याशिवाय जर एखादा सरकारी कर्मचारी सरोगसीद्वारे पिता बनला आणि त्याला दोनपेक्षा कमी मुले असतील तर त्याला मुलाच्या जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत 15 दिवसांची पितृत्व रजा मिळेल. हे नवीन नियम 18 जूनपासून लागू झाले आहेत. ज्या दिवशी हे नियम अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाले होते.

काय आहे सरोगसी ?..... 

सरोगसी म्हणजे दुसऱ्या महिलेचं गर्भाशय भाड्यानं घेऊन तिच्या मदतीनं अपत्य जन्माला घालणे. ज्या दाम्पत्याला काही कारणांमुळे मूल होऊ शकत नाही त्यांना सरोगसीच्या माध्यमातून मूल होऊ शकतं. काही महिला किंवा पुरुष सक्षम नसल्यामुळे किंवा याआधी अबॉर्शन झाल्यामुळे काही कपल्स मूल जन्माला घालू शकत नाही. पण सरोगसीद्वारे पालक बनू शकतात.

सरोगसीचे प्रकार कोणते?

सरोगसीमध्ये आई-वडील होऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्यापैकी पुरुषाचं स्पर्म बाळाला जन्म देणाऱ्या महिलेच्या एग्ग्ससोबत मॅच केलं जातं याला 'ट्रेडिशनल सरोगसी' म्हणतात. 
दाम्पत्याचे स्पर्म आणि एग्स टेस्ट ट्यूबमध्ये मिसळून बाळाला जन्म  देणाऱ्या महिलेच्या गर्भाशयात इन्सर्ट करण्यात येतात याला 'जेस्टेशनल सरोगसी' म्हणतात. त्यामुळे बाळाला प्रत्यक्ष जन्म देणारी महिला वेगळी असते. या महिलेला 'सरोगेट मदर' असं म्हंटल जातं.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT