Mehandi Hacks esakal
लाइफस्टाइल

Mehandi Hacks : तुम्ही हातावर मेहंदी काढल्यानंतर कधी फेव्हिकॉल लावला आहे का? प्रयोग करून पहा, फायदाच होईल

Mehandi Hacks :काही वेळा मेहंदी रंगली नाही म्हणून महिला काही उपाय करतात. लवंग, साखर- पाणी याचे उपाय करतात.

सकाळ डिजिटल टीम

Mehandi Hacks :

श्रावण महिन्यात सन समारंभ महिना आहे. श्रावणात अनेक सण असतात. त्यामुळे या महिन्यात महिलांची लगबग सुरू असते. श्रावणाच्या आधीच झाडून घेतल्याने महिला या महिन्यात देवाची कामे करण्यात मग्न असतात.

प्रत्येक जणाला कुठली साडी नेसायची कसा ड्रेस करायचा हे ठरलेलं असतं. अशा पद्धतीने श्रावणात एखाद्या सणाला तरी मेहंदी काढायची हे आधीच फिक्स झालेलं असतं. मेहंदी काढणे आणि ती रंगणे यात फरक आहे. काही वेळा मेहंदी रंगली नाही म्हणून महिला काही उपाय करतात. लवंग, साखर- पाणी याचे उपाय करतात.

पण असं काहीही न करता तुम्ही हाताला फेव्हिकॉल लावूनही मेहंदी रंगवू शकता. मेहंदी लावल्यानंतर ती सुकली की त्याचे तुकडे पडायला लागतात. हातावर पसरलेली मेहंदी चुरा होऊन आपल्या अंथरुणात घरभर पसरू लागते. या समस्येवर फेव्हिकॉल रामबाण उपाय आहे. हा प्रयोग कसा करायचा आणि खरंच फायदा होतो का हे जाणून घेऊया.

फेव्हिकॉलचा प्रयोग कसा करावा

  • सर्वात आधी तर तुमच्या हातावरती मेहंदी काढून घ्या.

  • मेहंदी सुकली की त्यावर फेव्हिकॉल लावून घ्या.

  • बोटांवरती आणि हातांवरती फेव्हिकॉल टाकून तो आईस्क्रीमच्या काडीने नीट पसरवून घ्या.

  • मेहंदी वरती लावलेला फेव्हिकॉल रात्रभर तसाच ठेवा आणि सकाळी काढा.

  • फेव्हिकॉल हाताने खरडून निघत नसेल तर तो पाण्याने सुद्धा निघू शकतो.

हाताला फेव्हिकॉल का लावावा ?

  1. हाताला फेव्हिकॉल लावल्याने मेहंदी सुकल्यानंतरही आपल्या हातावरती राहील आणि ती अधिक रंगेल.

  2. फेव्हिकॉल लावल्याने मेहंदी अंथरूणावर पसरणार नाही

  3. फेव्हिकॉल लावल्याने मेहंदी पाणी आणि घामापासून दूर राहते.त्यामुळे ती विरघळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT