Fashion 
लाइफस्टाइल

मॅरेज पार्टीत महिलाच सुंदर नव्हे तर पुरुषही दिसतील हॅंडसम ! त्यासाठी "या' टिप्स करा फॉलो 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : पुरुषांना चांगल्या सूट किंवा इंडो-वेस्टर्न कपड्यांसह गर्दीत उठून दिसण्यासाठी या काही टिप्स आहेत. केवळ महिलाच नव्हे तर प्रत्येक पुरुषाला देखील पार्टीमध्ये विशेषत: विवाह पार्टीमध्ये (समर वेडिंग पार्टी) चांगले दिसण्याची इच्छा असते. यासाठी ते सूट किंवा इंडो-वेस्टर्न कपड्यांचा प्रयत्न करतात. परंतु गर्दीत उठून दिसण्यासाठी आणखी काही टिप्स पाळणे आवश्‍यक आहेत. 

  • उन्हाळ्याच्या हंगामात लिनेनसारखे कोणतेही दुसरे फॅब्रिक नाही. लिनेन एक हलका सूती फॅब्रिक आहे, जो उन्हाळ्यात पोशाखासाठी सर्वोत्तम आहे. उन्हाळ्यात लग्न सोहळ्यासाठी आपल्याला या फॅब्रिकचे पोशाख अधिक चांगले दिसतील, जे आपल्याला परिधान करणे आरामदायक वाटेल. 
  • उन्हाळ्यात चमकदार व चटकदार रंगांच्या कपड्यांऐवजी पुरुषांनी क्रीम व पांढरे यांसारख्या हलक्‍या रंगाचे कपडे घालावेत. या रंगाचे कपडे आपल्याला आरामदायक राहण्यासह एक चांगला लुक देतील. वाटल्यास याच्याबरोबर ब्लेझर देखील घालू शकता. 
  • पुरुषांनी नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे, की त्यांनी परिधान केलेले कपडे अधिक घट्ट किंवा खूप सैल नसावेत. चांगल्या फिटिंगचे कपडे घालावेत. त्याचबरोबर लग्नाच्या पार्टीत टी-शर्ट आणि जीन्ससारखे कॅज्युअल कपडे घालणे टाळावे. 
  • इंडो-वेस्टर्न (इंडियन व वेस्टर्न कॉम्बिनेशन) फॅब्रिक्‍स आजकाल खूप लोकप्रिय आहेत. कारण, त्यांच्याकडे बरेच काम झालेले आहे आणि भरतकाम केलेले आहे. या डिझाईनचे आउटफिट्‌स तुम्हाला "रॉयल लूक' देतात. 

समर वेडिंग पार्टीमध्ये पुरुषांच्या लूकसंदर्भात या काही आणखी टिप्स... 

  • केस लहान आणि स्वच्छ ठेवा. चांगला शाम्पू वापरा आणि वाढलेले केस वेळेवर कापत जा. 
  • क्‍लीन शेव्ह लूक चांगला असेल, पण तुम्हाला शेव्हिंगची आवड असेल तर ते अशा प्रकारे ठेवा की ते स्वच्छ दिसेल आणि तुम्हाला क्‍लीन शेव्ह देईल. 
  • उन्हाळ्यात लिनेन शर्ट आणि सूट छान दिसतात. सौम्य लूकसाठी पांढरा, नीलमणी किंवा लिंबाचा पिवळा असा हलक्‍या रंगाचा शर्ट घाला. 
  • पादत्राणे देखील महत्त्वपूर्ण आहेत, म्हणून लॉफर्स किंवा फॅशनेबल पादत्राणे घाला. 
  • जर तुम्हाला ज्वेलरी घालण्यास आवडत असेल तर तुमच्यासाठी चांदीचे दागिने अधिक चांगले दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lockdown Strategy : मध्यपूर्वेत तणाव ! भारतात लॉकडाऊन लागणार ? पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे मोठे विधान

Latest Marathi News Live Update : देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, ४०० चा सिलिंडर १,१०० रुपयांवर...; ममता बॅनर्जी संतापल्या

Rinku Singh Video: लवकरच येऊन जॉइनिंग लेटर घेईन'; रिंकू सिंहने योगींचे मानले आभार! उपकर्णधारपदाच्या जबाबदारीसह नव्या इनिंगला सुरुवात

Hemant Godse Video Viral : भोंदूबाबा अशोक खरात माजी खासदाराचा हात बघून भविष्य सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल; लोकसभा निवडणुकीपूर्वी भविष्य जाणून घेतल्याची चर्चा!

OMG! सनी लियोनीचं घर पाहिलत का? लक्झरी पॅलेस पाहून फराह खान झाली शॉक, करोडों खर्च करून बनवलेलं आलिशान घर

SCROLL FOR NEXT