Mens Bracelets Fashion  
लाइफस्टाइल

Mens Bracelets Fashion : मुलींमध्ये सर्वात जास्त चर्चा असलेले मेन्स ब्रेसलेट!

मुलांची फॅशन म्हटली की ती मोजकीच असते

सकाळ डिजिटल टीम

Mens Bracelets Fashion : मुलांची फॅशन म्हटली की टी मोजकीच असते. काही हटके ट्राय करायचं म्हटलं तरी ते प्रत्येकालाच सूट होईल असं नाही. रेग्युलर वेअरमध्ये एकवेळेस ठीक आहे, पण काही नवीन लुक ट्राय करायचा असेल, छोट्या मोठ्या ट्रिप्स, कॅज्यूअल वेअर यात काहीतरी वेगळेपणा नक्की असावा.

यासाठी काही मुलं हातात ब्रेसलेट घालतात. हल्ली बाजारातही वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर ब्रेसलेट उपलब्ध आहेत आणि गंमत म्हणजे यापैकी काहींची चर्चा मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त आहे. हे ब्रेसलेट लांबून सुद्धा आपलं लक्ष वेधून घेतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात.

1. लेदर ब्रेसलेट

समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही असे ब्रेसलेट सहसा जास्त बघितले असतील. हे ब्रेसलेट लेदरने बनवलेले असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा असतात आणि हे दिसायलाही खूप सुंदर दिसतात.

2. रुद्राक्षाचे ब्रेसलेट

पूर्वीच्याकाळी अनेक लोकं हातात रुद्राक्षाची माळ घालायचे, अर्थात तेव्हा ती त्यांची जपमाळ होती, पण आता मात्र मुलांची फॅशन झाली आहे. यात तुम्ही स्फटिकांची ब्रेसलेट सुद्धा घालू शकतात.

3. सिल्व्हर ब्रेसलेट

असे फॅशनेबल ब्रेसलेट घालण्याची इच्छा नसेल आणि काहीतरी सोबर डिसेंट घालावस वाटत असेल तर सिल्व्हर ब्रेसलेट बेस्ट आहेत. तुम्ही हे प्लेन चेनसारखंही घालू शकतात किंवा तुम्ही यांना आपल्या पद्धतीने बनवून घेऊ शकतात.

4. दबंग ब्रेसलेट

ब्रेसलेटचा विषय होतो आहे आणि त्यात या ब्रेसलेटचा उच्चार नाही असं कसं? दबंग या मूव्हीनंतर सलमान खानचे हे ब्रेसलेट खूप चर्चेत आलं आणि नक्कीच मुलांमध्ये याची वेगळी ट्रेंड सुरू झाली, जी अजूनही सुरू आहे.

5. कस्टमाइज ब्रेसलेट

हे ब्रेसलेट आपण आपल्या आवडत्या व्यक्तीचे, आई वडिलांचे, मित्रांचे किंवा स्वतःचे नाव लिहून कस्टमाइज करू शकतो. सहसा याचा बेल्ट लेदर किंवा सिल्व्हर चेनचा असतो त्यामुळे हे खूप आकर्षित दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

Suspicious Truck Driver Death: ठाणाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; गळफास, जखमा व रक्ताचे डाग पाहता घातपाताची शक्यता

Pune Bakri Eid : बकरी ईदसाठी पुण्यात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; संवेदनशील भागात कडक सुरक्षा व्यवस्था

SCROLL FOR NEXT