Mental Health Sakal
लाइफस्टाइल

Mental Health: मेंटली चेकआउट म्हणजे काय? जाणून घ्या लक्षण अन् उपाय

Mental Health: तुम्हाला एकाग्रता वाढवायची असेल तर पुढील गोष्टींची मदत घेऊ शकता.

Puja Bonkile

तुम्हाला असे कधी वाटले आहे का की तुम्ही शारीरिकदृष्ट्या एखाद्या ठिकाणी आहात, पण मानसिकदृष्ट्या दुसरीकडे कुठेतरी आहात? खरं तर ही मानसिक आरोग्याची समस्या आहे. या स्थितीला मेंटली चेकआउट म्हणतात. या अवस्थेमध्ये माणसाचे मन विचलित होते. या मानसिक आरोग्याने त्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये एकाग्रतेचा अभाव जाणवतो.

लक्षणे

अनेक लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे असे लोक काम लक्ष देऊन करू शकत नाही. त्यांना कंटाळा येऊ लागतो.

ही मानसिक आरोग्य समस्या नातेसंबंधांवर देखील परिणाम करू शकते. जर तुमचा जवळचा माणूस तुमच्याशी बोलत असेल आणि त्याच्याकडे लक्ष देण्याऐवजी तुम्ही दुसऱ्याच विचारात मग्न असाल, तर समोरच्याला असे वाटते की तो काय बोलतोय यात तुम्हाला काही रस नाही. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

या मानसिक आरोग्याच्या समस्येचा परिणाम व्यक्तीच्या दैनंदिन कामांवरही होतो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही स्वयंपाक करत असाल किंवा स्वच्छता करत असाल आणि तुमचे मन दुसरीकडे कुठेतरी लागले असेल तर तुम्हाला ते काम नीट करता येणार नाही.

  • कोणते उपाय करावे

सकारात्मक विचार

मानसिक आरोग्यासंबंधित समस्या टाळण्यासाठी सकारात्मक विचार करणे खूप उपयुक्त आहेत. तसेच व्यायाम आणि ध्यान लावावे. यामुळे मानसिक शांती मिळते आणि मन विचलित होत नाही.

ध्येय निश्चित करावे

जर तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले तर तुम्हाला यश मिळवणे सोपे होते. ज्यामुळे तुमचे मन इकडे-तिकडे विचलित होणार नाही.

काळजीपुर्व ऐका

जेव्हा कोणी तुमच्याशी बोलत असेल तेव्हा काळजीपूर्वक ऐका आणि तुमचा उत्साह दाखवा. याच्या मदतीने तुम्ही तुमचे मन विचलित होण्यापासून थांबवू शकता.

योगा करावा

मानसिक आरोग्याशी संबंधित आजार टाळण्यासाठी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. जसे की व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, पोषक पदार्थांचे सेवन करावे आणि आपले छंद जोपासावे.

नवीन गोष्टी शिका

काहीतरी नवीन शिकण्याची सवय लावा. कारण असे केल्याने माणसाचे मन इकडे-तिकडे विचलित होत नाही. यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्याही निरोगी राहता.

समाधानी राहावे

तुमच्या जीवनात जे काही आहे त्याबद्दल समाधानी राहावे. कारण अनेक वेळा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात नसलेल्या गोष्टींवर दु:ख व्यक्त करतात. यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्यांना बळी पडतात.

नियम ठरवावे

तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात एक सीमा निश्चित करावी. याशिवाय जी कामे जास्त महत्त्वाची आहेत त्यावर लक्ष केंद्रित करावे.

सोशल मीडियाचा वापर कमी

तुमचे मन विचलित होण्यापासून थांबवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर कमी करावा. तुम्ही घरी आल्यावर तुमच्या फोनवरील नोटीफिकेश बंद करावे. यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra: मान्सून जैसे थे! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज; विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात हरकतींचा पाऊस; शेतकरी आक्रमक, ऐतवडे खुर्दमधील 182 एकर सुपीक जमीन होणार बाधित

SAFF Women Football: 'त्या' दोन पराभवांचा बदला घेणार? भारतीय महिला फुटबॉल संघासमोर बांगलादेशचे तगडे आव्हान; आजपासून थरार!

Pimpri: उद्योगनगरीत मेट्रोचा विस्तार कासवगतीने;उद्योगनगरीत मेट्रोचा विस्तार कासवगतीने

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

SCROLL FOR NEXT