mix and match saree blouse outfit sakal
लाइफस्टाइल

मिक्स ॲण्ड मॅच

साडी सदैव आणि सर्वोत्तम आउटफिट. साडी स्त्रीचे सौंदर्य खुलवते, तर उत्तम फिटिंगचा साधे ब्लाऊजसुद्धा या आउटफीटला ग्रेसफुल बनवते.

सकाळ वृत्तसेवा

- पृथा वीर

साडी सदैव आणि सर्वोत्तम आउटफिट. साडी स्त्रीचे सौंदर्य खुलवते, तर उत्तम फिटिंगचा साधे ब्लाऊजसुद्धा या आउटफीटला ग्रेसफुल बनवते. थोडी मेहनत घेतली तर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज साध्या साडीला स्टायलिश आणि सुंदर बनवते.

आजकाल हॅंडलूम ब्लाऊजमध्ये अनेक हटके प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. हे ब्लाऊज तुमच्या विविध साड्यांवर मॅच होऊ शकतात. ब्लाऊज शिऊन घेण्यापेक्षा रेडीमेड विकत घेणं सोयीचं होतं. एक ब्लाऊज तुम्हाला अनेक साड्यांबरोबर मॅच अथवा मिसमॅच करता येतो. कॉटन आणि हॅंडलूम फॅब्रिकमधले ब्लाऊज स्कीन फ्रेंडली आहेत. हे ब्लाऊज ड्रायक्लीनला द्यायची गरजही भासत नाही.

इरकल बॉर्डर वर्क आणि त्यामधे केलेल्या हटके पेटिंग्जमुळे ब्लाऊज एथनिक वाटतात. हे ब्लाऊज कोणत्याही हॅंडलूम अथवा कॉटन साडीसोबत कॅरी करता येतात. पिवळा, बॉटर ग्रीन, मोरपंखी, केशरी, काळा आणि गर्द निळा अशा रंगांचे ब्लाऊज ग्रेसफुल वाटतात.

कोणत्याही पारंपरिक कॉटन साडीसोबत, हिरव्या रंगाच्या खणाच्या कापडासोबत केशरी रंगाचे इकत ब्लाऊज खुलून दिसतात. सध्या कलमकारी कापडातील ट्रेंडी ब्लाऊजची फॅशन आहे. ब्लॅक अँड रेड इकत डिझाईन ब्लाऊज हाही पर्याय आहे.

डिजिटल प्रिंट ब्लाऊजची फॅशन लोकप्रिय होत आहे. याशिवाय मल्टीकलर ब्लाउज कोणत्याही साडीवर मॅच होऊ शकतात. ऑल टाईम फेव्हरेट ब्लॅक डिझाईन काळ्या रंगाचे ब्लाऊज कोणत्याही साडीवर मॅच करता येतात. कलमकारी आणि इकत, कलमकारी आणि इंडीगो असं कॉम्बिनेशन्स वापरून डिझाईन केलेले ब्लाऊज एलिंगट दिसतात. प्लेन साडीवर डार्क शेडचे ब्लाऊज आणि प्रिटेंड साडीवर फेडेड ब्लाऊज छान दिसतात.

अर्थातच ब्लाऊजमध्ये असंख्य प्रकार आहेत. वारलीची लोकप्रियता लक्षात घेऊन वारली एम्ब्रॉयडरी व टिकली वर्कचे डस्टी इंग्लिश रंगाचे ब्लाऊज आणि साडी हा उत्तम आऊटफीट आहे. हँडलूमशिवाय ब्लाऊजचे अजून पर्याय आहेत.

लग्नासाठी तयारी सुरू असेल, तर क्लासिक ब्लाऊज हवेत. कारण साडी कितीही महाग असो वा सुंदर, ब्लाऊज जास्त महत्त्वाचे. छान, स्टायलिश आणि महत्त्वाचे म्हणजे परफेक्ट फिटिंग ब्लाऊजशिवाय अपूर्ण दिसते. त्यामुळे साडी निवडताना ब्लाऊजची निवड करताना वेळ द्यावाच लागतो.

सध्या नेकलाइन, ऑफ शोल्डर, गोटा-पट्टी वर्क ब्लाऊज, फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज, रॉयल टच ब्लाऊज, झीरो नेकलाइन, फ्लोरल ब्लाऊज, क्रिस-क्रॉस, प्लेन ब्लाऊज, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज, साधे सोबर ब्लाऊज, एलबो लेंथ स्लीव्ह, मटका नेक ब्लाऊज, ब्रोकेड ब्लाऊज, स्नो व्हाइट, फ्रिल स्लिव्ह्‌ज, हेवी एम्ब्रॉयडरी ब्लाऊज आदी प्रकार ट्रेंडमध्ये आहेत, असे तज्ज्ञ सांगतात. साध्या प्लेन ऑर्गेन्झा किंवा शिफॉन साडीवर ऑफशोल्डर ब्लाऊज छान दिसतात.

भारी साडी किंवा लेहंग्याला रॉयल टच द्यायचा असेल तर फुल स्लीव्ह्‌ज ब्लाऊज हवेत. कांजीवरम, बनारसी सिल्क साड्या स्टायलिश आणि रॉयल दिसतात. या साडीवर समान रंगाचे साधे कॉन्ट्रास्ट किंवा गोल नेक सिल्क ब्लाऊज सुंदर वाटतात.

उन्हाळ्याच्या दिवसांत फ्लोरल ब्लाऊज म्हणजे उत्तम पर्याय. फुलांच्या फुल स्लिव्ह्‌ज ब्लाऊजसोबत फ्लोअर प्रिंट साडी सौंदर्य खुलवते. ब्लाऊज हा प्रकार कधीही ट्रेंडच्या बाहेर जात नाही.

वेडिंग साडी ब्लाऊज डिझाइनचे सर्वांत परिपूर्ण उदाहरण म्हणजे मटका गळा. ही फॅशन साडी, डिझायनर लेहंगा अशी कशावरही छान दिसते.

काळानुसार बदल

साडीला हटके लुक देण्यासाठी तुम्ही साडीवर कोणत्या स्टाईलचे ब्लाऊज कॅरी करता हे फार महत्त्वाचं असतं. काळानुरूप ब्लाऊजचा ट्रेंड सतत बदलत असतो. पूर्वीसारखा मॅचिंग ब्लाऊज घालण्याचा ट्रेंड आता नाही. पूर्वी साडीला तंतोतंत मॅच होणारे ब्लाऊज वापरले जायचे; पण काळानुसार ब्लाऊजचा ट्रेंड बदलत चालला आहे. कॉन्ट्रास्ट कलर आणि डिझायनर ब्लाऊजची फॅशन सध्या इन आहे. हॅंडलूम आणि कॉटन साड्यांवरील खणाचे डिझानर ब्लाऊज तुम्हाला अगदी ट्रेंडी लूक देऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

Maharashtra Politics: डोंबिवलीत राजकीय पलटवार! भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

Gujarat Ats : गुजरात एटीएसची मोठी कारवाई: 'रायसिन' विष तयार करणाऱ्या डॉक्टरसह तीन जण अटकेत!

Indian History : भारताचा इतिहास केवळ राजा, सैन्य आणि विजयापुरता मर्यादित नाही; डॉ. कृष्ण गोपाल!

कल्याण डोंबिवलीत ठाकरेंसह शिंदेंना धक्का, भाजपने एका दगडात मारले दोन पक्षी; बड्या नेत्याचा भाजपप्रवेश

SCROLL FOR NEXT