Mole on Body esakal
लाइफस्टाइल

Mole on Body : शरीराच्या या भागांवर तीळ असणं अशुभ, तुम्हाला तर...

काही लोकांच्या शरीरावर खूपच तिळा असतात तर काही लोक मुद्दाम काजळ, लायनरने खोटे तीळ काढतात.

सकाळ डिजिटल टीम

Samudra Shastra About Mole On The Body : तीळ बहुतेक प्रत्येकाच्याच शरीरावर असतात. काहींच्या चेहऱ्यावर, हातावर, अंगावर, ओठांवर तर काहींच्यातर डोळ्यातही तीळ असते. पण काही तुरळक लोक असे असतात ज्यांना तीळ नसते. किंवा असली तरी एखाद-दुसरी. त्यामुळे सौंदर्य खुलवण्यासाठी काही महिला लायनर किंवा काजळाने आर्टीफीशियल तीळ लावून घेतात. पण तुम्हाला माहित आहे का की, तुमच्या शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आहे त्यावरून ते तुम्हाला शुभ आहे की अशुभ हे समुद्रशास्त्र सांगतं.

चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आणि त्याचा अर्थ काय? कोणत्या भागावर तीळ असणं अशुभ असतं ते बघुया.

समुद्रशास्त्र तुमच्या शरीराची ठेवण, खुणा, देहबोली यावरुन तुमचा स्वभाव, आयुष्याविषयी बरेच काही सांगते. यातच शरीरावर असलेल्या तीळांचेही महत्व सांगितले आहे. काही तीळा माणसाला भाग्यवान बनवतात. तर काही तीळ तुमच्यासाठी अशुभ असतात.

असं सांगितलं जातं की, समुद्रशास्त्रानुसार तीळाचा रंग जर काळा असेल तर तो अशुभ मानला जातो. माणसाला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

Mole on Body

भुवईवर तीळ

सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या डाळ्या भुवईवर तीळ असेल त्यांना व्यवसाय, नोकरीमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

कपाळावर तीळ

जर कोणाला कपाळावर डाव्या बाजूला तीळ असेल तर शुभ मानले जात नाही. असा विश्वास आहे की, या व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करतात. स्वार्थी असतात.

Mole on Body

नाक आणि डोळ्यावर तीळ

सामुद्रीक शास्त्रानुसार व्यक्तीच्या डाव्या डोळ्यावर तीळ असेल तर तो माणूस अहंकारी असतो. असे लोक स्वतःला जगासमोर दाखवण्याचा प्रयत्न करतात.

पाठीवर तीळ

एखाद्या व्यक्तीच्या खांद्याच्या खाली तीळ असेल तर शुभ मानले जात नाही. अशा व्यक्तीला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. अगदी लहानशा यशासाठीही अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.

Mole on Body

ओठांवर तीळ

सौंदर्याची खुण म्हणून बऱ्याच महिला ओठांवर तीळ नसेल तर ती कृत्रीमरित्या काढतात. पण ज्यांच्या ओठांवर तीळ असते, त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. शास्त्रानुसार अशा लोकांना लठ्ठपणा आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking: गॅस सिलेंडर बुकिंग नियमात आठवड्यात 3 वेळा बदल! गावाकडे आता किती दिवसांनी करता येणार बुकिंग?

Clerk Bribery Viral Video : निवृत्त महिलेकडून 45 हजारांची लाच घेताना बडा लिपिक कॅमेऱ्यात कैद; नोटा मोजतानाचा तोरा तर पाहा, आरोग्य विभागात खळबळ

Whatsapp New Feature : तुमच्या पालकांना कळणार तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये काय करताय; आलं Parental Control फीचर, कसं वापरायचं पाहा

Supreme Court : मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, काय दिलं कारण?

NEET (UG) 2026: नीट (यूजी) २०२६ अर्जातील दुरुस्तीची संधी; १४ मार्चपर्यंत तपशील बदलता येणार

SCROLL FOR NEXT