Money Management esakal
लाइफस्टाइल

Money Management : कितीही कमवलं तरी महिना अखेरीला ठणठण गोपालाच? ट्राय करा 'या' टिप्स

पैसा कुठे येतो अन् कुठे जातो कळतच नाही, अशी ओरड घराघरात असते. महिन्याच्या शेवटी पैसे उरतच नाहीत? या टिप्स तुमच्याच साठी

सकाळ डिजिटल टीम

How to Manage Monthly Money : खुश है जमाना आज पेहली तारीख है...! हे गाणं लहानपणापासून अनेकांनी ऐकलं असेल. महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार होत असल्यामुळे जणू तो दिवस दिवाळी सारखा समजला जायचा. पण नंतर महिनाभर पुन्हा पुढच्या पगाराची वाट पाहिली जातं. आजही मध्यम वर्गात परिस्थिती फार काही बदललेली नाही.

पैसा कुठे येतो अन् कुठे जातो कळतच नाही, अशी ओरड घराघरात असते. कितीही कमवलं तरी महिन्याच्या शेवटी नेहमीप्रमाणे ओढाताण असतेच. फार काही मोठा खर्च न करताही पैसे गेले कुठे असा प्रश्न पडतोच. या प्रश्नाचं उत्तर इथं देणार आहोत.

Money Management

सोशल मीडिया इंफ्लूएंसर, ज्योतिष, मोटीव्हेशनल स्पीकर, वास्तू तज्ज्ञ डॉ. जाई मदान याविषयी मार्गदर्शन करतात. महिन्याच्या शेवटी पडणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी त्यांनी काही सोप्या ट्रिक्स सुचवल्या आहेत.

Money Management

कसं करावं पैशाचं नियोजन?

  • दिवसभराच्या खर्चाची एक डायरी मेंटेन करा.

  • दिवसभरातला लहानतला लहान खर्चाची त्यात नोंद ठेवा.

  • चहा, चॉकलेट गोळ्यांसारख्या लहान खर्चापासून किराणा, कपडे खरेदी इत्यादी मोठ्या खर्चांपर्यंत सगळ्याची त्यात नोंद करा.

  • अशी नोंद न विसरता आठवडाभर करा.

  • नंतर वाढवत नेत महिनाभर करा.

  • प्रत्येक रविवारी झोपण्याआधी १० मिनीट हा खर्च बघा.

  • त्याला दोन भागात विभागात वाँट आणि नीड.

  • जे हवं म्हणून केलेला खर्च आहे त्यावर W लिहा. आणि जो गरजेचा खर्च होता त्याला N लिहा.

  • मग W किती ठिकाणी आहे आणि N किती ठिकाणी ते मोजा.

  • कशाचं प्रमाण अधिक आहे ते मोजा.

  • जिथे W चं प्रमाण अधिक आहे ते टाळता येऊ शकतं का याचा अंदाज घ्या.

  • असं नियमित केल्याने तुमच्या खर्चाच्या नोंदीतला W कमी होत जाईल आणि N तेवढं जास्त दिसेल.

  • त्यामुळे महिन्याच्या शेवटी हातात उरणाऱ्या शिल्लकीचा तुम्हालाच अंदाज येईल.

  • ही सवय लावून घेतली तर महिन्याच्या शेवटी जाणवणारी पैशाची चणचण कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

‘धुरंधर’च्या टीमची तब्येत बिघडण्याचं खरं कारण समोर; सेटवरील जेवण नाही तर लेहमध्ये पसरलेलं मोठं फूड कंटॅमिनेशन

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT