Monsoon Hair Care esakal
लाइफस्टाइल

Monsoon Hair Care : पावसात भिजल्यावर केसांचा येतो घाणेरडा कुबट वास? असा करा चुटकीसरशी दूर

Hair Care Tips : पावसात केसांचा वास दूर करण्यासाठी तुम्ही दही आणि दालचिनी वापरू शकता. यामुळे केसांचा चिकटपणा कमी होऊ लागतो ज्यामुळे तुमच्या केसांना दुर्गंधी येत नाही.

सकाळ डिजिटल टीम

Monsoon Hair Care :

पाऊस सुरू होताच लोकांना चहा, भजी खावेसे वाटत असतानाच या ऋतूतही अनेक समस्या येतात. पण रिल आणि रिअलमधील पावसात फरक आहे. ऑफिसमधून कॉफीचा कप हातात घेऊन खिडकीतून पाऊस पाहणं वेगळं, आणि मुसळधार पावसात, वाऱ्यात छत्री सांभाळत प्रवास करणं वेगळं. त्यामुळ आजार पसरतात हे वेगळंच.

अनेक वेळा ऑफिसला निघाल्याबरोबर पाऊस पडतो, त्यामुळे लोक पुन्हा पुन्हा भिजतात. पावसात भिजल्यामुळे त्वचेसोबत केसांनाही त्रास होऊ लागतो. एकीकडे या ऋतूत चिकट केसांमुळे लोक त्रस्त असतात, तर दुसरीकडे वारंवार ओल्या केसांमुळे टाळूला दुर्गंधी येऊ लागते.

पावसाळ्यात केसांचा वास दूर करण्यासाठी लोक अनेक पद्धती वापरतात पण त्या उपयोगी पडत नाहीत. केसांना येणारा वास दूर करण्यासाठी तुम्ही या टिप्स वापरू शकता. (Hair Care Tips)

पावसाळ्यात केसांशी संबंधित समस्या येणे सामान्य गोष्ट आहे. जर तुम्हीही टाळूशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल किंवा पावसात भिजल्यानंतर तुमच्या केसांना दुर्गंधी येऊ लागली असेल, तर या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी दही आणि दालचिनी उपयोगी पडेल.

पावसात केसांचा वास दूर करण्यासाठी तुम्ही दही आणि दालचिनी वापरू शकता. यामुळे केसांचा चिकटपणा कमी होऊ लागतो ज्यामुळे तुमच्या केसांना दुर्गंधी येत नाही. यासाठी तुम्ही दही आणि दालचिनीच्या मदतीने हेअर मास्क तयार करू शकता.

हे करण्यासाठी एका भांड्यात एक चमचा दालचिनी पावडर आणि दही मिसळा. आता ते केसांना नीट लावा. आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क लावल्याने केसांना वास येणे थांबेल.

ऍपल सायडर व्हिनेगर

केसांची दुर्गंधी दूर करण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगर वापरा. यासाठी प्रथम एक ते दोन चमचे व्हिनेगर घ्या आणि त्यात एक ग्लास थंड पाणी मिसळा. या पाण्याने केस चांगले धुवा. काही दिवसातच तुम्ही तुमच्या केसांची दुर्गंधी दूर करू शकता.

बेकिंग सोडा वापरा

या उपायासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा हेअर मास्क तयार करू शकता. बेकिंग सोड्याने केस स्वच्छ करण्यासाठी, एक चमचा बेकिंग सोडा पाण्यात मिसळा आणि नंतर या पाण्याने केस धुवा. असे केल्याने काही दिवसात केसांच्या दुर्गंधीपासून सुटका होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT