Trendy Raincoat Options esakal
लाइफस्टाइल

Trendy Raincoat Options : रेनकोटमध्ये स्टायलिश लूक हवांय? मग, खरेदी करण्यापूर्वी ‘या’ ट्रेडिंग रेनकोट्सबद्दल घ्या जाणून

Trendy Raincoat Options : पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी अनेकदा आपण रेनकोट आणि छत्रीचा आधार घेतो.

Monika Lonkar –Kumbhar

Trendy Raincoat Options : देशातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काही राज्यांना पुराचा धोका बसला असून, काही ठिकाणी हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी अनेकदा आपण रेनकोट आणि छत्रीचा आधार घेतो.

रेनकोटमध्ये जर तुम्हाला स्टायलिश लूक हवा असेल तर आजकाल मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यापैकी तुम्हाला हवा तो रेनकोट तुम्ही निवडू शकता आणि छान स्टायलिश लूक मिळवू शकता.

मार्केटमध्ये आजकाल फ्लोरल, लेदर, हुडी आणि ट्रेंच कोट सारखे रेनकोटचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला आरामदायक ही वाटेल आणि मस्त ट्रेंडी लूक ही मिळू शकेल. चला तर मग जाणून घेऊयात रेनकोटच्या या आकर्षक आणि हटके पर्यायांबदद्ल.

जॅकेट स्टाईल रेनकोट

नेहमीच्या रेनकोटपेक्षा जरा वेगळा रेनकोट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या जॅकेट स्टाईल रेनकोटची नक्कीच निवड करू शकता. विशेष म्हणजे हा रेनकोट कॅरी करायला अतिशय सोपा आहे.

जॅकेट स्टाईल रेनकोट

यामध्ये तुमचा लूक एकदम स्टायलिश आणि कूल दिसतो. या रेनकोटमुळे तुमचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण होते आणि कपडे देखील ओले होत नाहीत. मार्केटमध्ये या प्रकारचे रेनकोट तुम्हाला सहज मिळतील.

फ्लोरल प्रिंट रेनकोट

अनेक महिलांना रेनकोटमधील तेच तेच प्लेन रंग कंटाळवाणे वाटतात. जर तुम्हाला रेनकोटमध्ये फ्लोरल प्रिंट मिळाली तर तुम्हाला नक्कीच ते आवडेल. यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही या प्रकारच्या फ्लोरल प्रिंटच्या रेनकोटची नक्कीच निवड करू शकता.

फ्लोरल प्रिंट रेनकोट

शिवाय, यामध्ये तुम्हाला अनेक भन्नाट प्रकार आणि पर्याय पहायला मिळतील. या रेनकोटमुळे तुम्हाला मस्त आणि ट्रेंडी लूक मिळतो. शिवाय, पावसापासून तुमचे संरक्षण होते.

हुडी रेनकोट

काही महिलांना हुडी जॅकेट्स किंवा हुडी टीशर्ट प्रचंड आवडतात. जर तुम्हाला रेनकोटमध्ये देखील असा पर्याय हवा असेल तर, तुम्ही या प्रकारच्या हुडी रेनकोटची नक्कीच निवड करू शकता.

हुडी रेनकोट

या हुडी रेनकोटमध्ये तुमचा लूक ट्रेंडी आणि स्टायलिश तर दिसेलच, शिवाय, पावसाच्या पाण्यापासून डोके आणि केसांचा भिजण्यापासून बचाव ही करता येईल. हे हुडी रेनकोट केवळ स्टायलिशच नाही तर पावसापासून संरक्षण करण्यासाठी एकदम बेस्ट आहेत.

ट्रेंच कोट रेनकोट

ट्रेंच कोट या प्रकारचे रेनकोट तुम्ही परिधान केल्यास यात तुम्हाला स्टायलिश आणि ट्रेंडी लूक मिळतो. पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी हा एक उत्तम आणि क्लासी पर्याय आहे. या रेनकोटमध्ये तुम्हाला प्रोफेशनल आणि स्मार्ट लूक मिळतो. खास करून ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case : मुलीच्या शरीरावर टणक हत्याराने वार केल्याने जखमा; शवविच्छेदन अहवालात आणखी काय? आरोपीला कुणी केली मदत?

Baramati Politics: अजितदादांच्या अपघाती जाण्याने जनतेचे स्वप्न अधुरे; २०२९ मध्ये सुनेत्रा वहिनींनीच बारामतीतून लढावे : जय पवार

Latest Marathi News Live Update : डीएमकेने आज आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव मंजूर केले

Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये 'निशांत' पर्व सुरू! नितीश कुमारांच्या सुपुत्राकडं आरोग्य विभागाची धुरा; 32 नव्या मंत्र्यांची शपथ, भाजपच्या 9 बड्या नेत्यांना डच्चू

iPhone 17 चक्क 45 हजारपेक्षा कमी किंमतीत मिळतोय; 'इथे' खरेदी केल्यास मिळेल बंपर डिस्काउंट, ऑफर सुरू होताच लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT