Monsoon Saree Tips esakal
लाइफस्टाइल

Monsoon Saree Tips : पावसाळ्यात ट्रेंडी दिसायचंय? मग, अभिनेत्रींच्या 'या' लूक्सपासून घ्या प्रेरणा, दिसाल एकदम झकास.!

Monsoon Saree Tips : पावसाळ्यात योग्य प्रकारचे कपडे न घातल्यास बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका असतो.

Monika Lonkar –Kumbhar

Monsoon Saree Tips : उन्हाळा किंवा हिवाळा असला की, त्याप्रमाणे आपण आहाराची काळजी घेतो. तसेच, आपण ऋतूनुसार अनुकूल कपडे घालतो. तसेच, अगदी पावसाळ्यातही करायला हवे. कारण, पावसाळ्यात योग्य प्रकारचे कपडे न घातल्यास बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका असतो. ऋतू कोणताही असो महिलांना साडी नेसायला नेहमीच आवडते.

परंतु, पावसाळ्यात साडी नेसताना त्यांना प्रश्न पडतो की, नेमक्या कोणत्या प्रकारच्या साड्या नेसाव्यात?कारण, या दिवसांमध्ये हेव्ही फॅब्रिकची साडी नेसली तर ती कॅरी करताना अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे, पावसाळ्यात शक्यतो लवकर सुकणाऱ्या आणि कॅरी करायला ही लाईटवेट असणाऱ्या साड्या परिधान करायला हव्यात.

पावसाळ्यात महिला कॉटन किंवा शिफॉनच्या साड्या नेसायला प्राधान्य देतात. जर तुम्हाला पावसाळ्यात साडीवर सुंदर लूक हवा असेल तर आज आम्ही तुम्हाला काही खास प्रकारच्या साड्यांबद्दल सांगणार आहोत. ज्या पावसाळ्यात ट्रेंडला आहेत. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही अभिनेत्रींचे साडी लूक दाखवणार आहोत. त्यांच्यापासून टीप्स घेऊन तुम्ही पावसाळ्यात नक्कीच सुंदर लूक करू शकता.

ब्लॅक फ्लोरल साडी

जर तुम्हाला दिवसभरातील एखाद्या फंक्शनसाठी साडी नेसायची असेल तर, तुम्ही या प्रकारची शिफॉन साडी नेसू शकता. अभिनेत्री रश्मिका मंदानाने ही काळ्या रंगाची फ्लोरल प्रिंट असलेली सुंदर शिफॉन साडी नेसली आहे.

या प्रकारची साडी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल. यावर मिनिमल मेकअप, ज्वेलरी आणि रश्मिकाप्रमाणे केसांची स्लीक स्टाईल ठेवू शकता.

प्लेन गुलाबी साडी

पावसाळ्यात प्लेन रंगाचे शिफॉनचे कपडे किंवा साड्या अधिक उठून दिसतात. या  दिवसांमध्ये तुम्ही अभिनेत्री आलिया भट्टप्रमाणे अशा प्रकारची प्लेन गुलाबी रंगाची साडी नक्कीच नेसू शकता.

यावर हवं तर तुम्ही वेगळ्या रंगाचा स्टायलिश ब्लाऊज परिधान करू शकता. या प्रकारची साडी तुम्हाला बाजारात सहज मिळेल. या साडीवर तुम्ही आलियाप्रमाणे मोकळे केस आणि मिनिमल मेकअप करू शकता.

फ्लोरल प्रिंट आणि बॉर्डर

जर तुम्हाला स्वत:ला लाईट रंग आवडत असतील तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही अभिनेत्री करिना कपूरने परिधान केलेली लाईट रंगाची फ्लोरल विथ बॉर्डर असलेली साडी परिधान करू शकता.

विशेष म्हणजे या साडीला लाईट बॉर्डर असल्यामुळे ही साडी अधिक खुलून दिसते. तुम्ही यावर पोनीटेल आणि हलकासा मेकअप करू शकता. यामुळे, तुमचा लूक सुंदर दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Rain-Maharashtra Latest live news update: मालेवाडी परिसरात पूरस्थिती, सोळा गावांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT