use of coconut oil for face a toner and face mask also easy tips 
लाइफस्टाइल

'या' टीप्स फॉलो करा अन् चेहऱ्यावरील तेलकटपणा करा दूर

पावसाळ्यात चेहऱ्यावरील घाम व तेलकटपणा कसा कराल कमी?

शर्वरी जोशी

पावसाळा सुरु झाला की उन्हाळ्यात जाणवलेला उष्णतेचा सगळा त्रास निघून जातो. परंतु, या नव्या ऋतुमध्ये अनेक आजार, शारीरिक समस्या डोकं वर काढतात. वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम आपल्या शरीरावरही होत असतो. यात अनेकांना चेहऱ्यावर सतत घाम येतो. खरं तर उन्हाळ्यात घाम येण्याची समस्या जाणवते. परंतु, अनेकांना ऋतू बदलला की चेहऱ्यावर घाम येतो. म्हणूनच, पावसाळ्यात चेहऱ्यावरील घाम व तेलकटपणा कसा कमी करावा ते जाणून घेऊयात. (monsoon-skin-care-apply-homemade-face-pack-to-stay-away-from-the-stickiness-on-the-face-ssj93)

१. चंदनाचा लेप -

चंदनाचा लेप लावल्यामुळे चेहऱ्याला नैसर्गिकरित्या ओलावा आणि थंडावा मिळतो. त्याचसोबत चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल, डाग कमी होण्यासही मदत मिळते. चंदनाची पावडर, हळद आणि गुलाबपाणी मिक्स करुन त्याचा लेप तयार करा व १० मिनीटे चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर लेप वाळल्यावर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून २ वेळा हा लेप चेहऱ्यावर लावला तर नक्कीच फरक दिसून येतो.

२. अंडी -

चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल थांबवण्यासाठी अंड्यांमधील पांढरा भाग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या पांढऱ्या भागामुळे चेहऱ्यावर येणारं तेलं कमी होतं. त्यासाठी अंड्यातील पांढऱ्या भागात १ चमचा मध मिक्स करा व हा लेप चेहऱ्याला लावा. १० मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

३. केळी -

केळ्याच्या मदतीनेदेखील तुम्ही चेहऱ्यावरील चिकटपणा व तेलकटपणा कमी करु शकता. तसंच केळ्यामुळे स्कीन सॉफ्ट होण्यासही मदत मिळते. यासाठी केळी आणि मध मिक्स करा व हा लेप चेहऱ्याला लावा. त्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT