Monsoon Special Hairstyles esakal
लाइफस्टाइल

Monsoon Special Hairstyles : पावसाळ्यात कूल अन् आकर्षक दिसायचेय? मग, ट्राय करा ‘या’ सोप्या हेअरस्टाईल्स

Monsoon Special Hairstyles : पावसाळ्यात वातावरणातील बदलांचा केसांवर ही परिणाम होतो.

Monika Lonkar –Kumbhar

Monsoon Special Hairstyles : देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे सभोवतालचे वातावरण अल्हाददायक आणि थंड झाले आहे. परंतु, पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे आपल्या आरोग्यावर, केसांवर आणि त्वचेवर ही परिणाम होतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये आरोग्याची, त्वचेची आणि केसांची खास काळजी घ्यावी लागते.

पावसाळ्यात वातावरणातील बदलांचा केसांवर ही परिणाम होतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये केसांची खास काळजी घेणे आणि हेअरस्टाईल करणे गरजेचे आहे. जेणेकरून केस ही व्यवस्थित राहतील आणि हेअरस्टाईलमुळे तुमचे व्यक्तिमत्व आणखी खुलून दिसेल. आज आपण पावसाळ्यात केसांसाठीच्या खास सोप्या हेअरस्टाईल्स कोणत्या आहेत? त्या जाणून घेणार आहोत.

मेसी पोनीटेल

मेसी पोनीटेल ही अनेक महिलांची आवडती हेअरस्टाईल आहे. विशेष म्हणजे ही हेअरस्टाईल पारंपारिक आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या आऊटफीट्सवर कमाल दिसते.

ही हेअरस्टाईल करण्यासाठी केसांचे दोन भाग करा किंवा दोन भागांमध्ये केस विभागून घ्या आणि मागच्या बाजूने केस खाली बांधा. तुमची मेसी पोनीटेल तयार आहे. या हेअरस्टाईलला आणखी खुलवण्यासाठी तुम्ही स्टायलिश लूक देऊ शकता.

ब्रेडेड हेअरस्टाईल

जर तुम्हाला केसाची सोपी हेअरस्टाईल करायची असेल तर त्यासाठी ही ब्रेडेड हेअरस्टाईल सर्वोत्तम पर्याय आहे. अभिनेत्री अनन्या पांडेची ही ब्रेडेड २.० ही हेअरस्टाईल एकदम क्लास आहे.

वेस्टर्न आऊटफिटवर या प्रकारची हेअरस्टाईल आणखी खुलून दिसते. तुम्ही कोणत्याही फॅन्सी टॉपवर किंवा शॉर्ट वनपीसवर या प्रकारची हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करू शकता.

स्लीक पोनीटेल

स्लीक पोनीटेल ही हेअरस्टाईल तरूणींमध्ये विशेष लोकप्रिय आहे. वेस्टर्न किंवा पारंपारिक अशा कोणत्याही प्रकारच्या आऊटफीटवर ही हेअरस्टाईल खुलून दिसते.

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेपासून आणि घामापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही केसांची ही सुंदर स्लीक पोनीटेल करू शकता. तसेच, तुमच्या लूकनुसार केस सेट करण्यासाठी तुम्ही हेअरस्टायलिंग जेल किंवा हेअरस्प्रेचा देखील वापर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT