Monsoon Travel Tips  esakal
लाइफस्टाइल

Monsoon Travel Tips : पावसाळ्यात धबधबे अन् डोंगराच्या परिसरात फिरायला जाताय? मग, 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Monsoon Travel Tips : पावसाळ्यात नद्या, तलाव आणि डोंगराळ भागात फिरायला जाण्याचे टाळावे.

Monika Lonkar –Kumbhar

Monsoon Travel Tips : सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे, कोल्हापूर, मुंबईसहीत अनेक शहरांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे, नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे.

खरे तर पावसाळ्यात अनेक जण फिरायला जाण्याचा देखील प्लॅन करतात. परंतु, या दिवसांमध्ये नद्या, तलाव आणि डोंगराळ भागात फिरायला जाण्याचे टाळावे. कारण पावसाळ्यात अधिकच्या पावसामुळे नद्या आणि तलावांच्या पाणी पातळीत वाढ होण्याचा धोका असतो.

शिवाय, डोंगराळ भागात दरडी कोसळणे आणि भूस्खलन होण्याचा देखील धोका असतो. त्यामुळे, जर तुम्ही या दिवसांमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

पूर

सध्या देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाच्या पाण्यामुळे नद्या आणि तलावांच्या पाण्याची पातळी वाढते. जास्त पाऊस वाढला की, ही पाणी-पातळी देखील वाढते.

त्यामुळे, या दिवसांमध्ये जर तुम्ही नद्या आणि तलावांजवळ सुट्टी घालवण्यासाठी किंवा फिरण्यासाठी जात असाल तर पाण्याच्या पातळीबाबत जागरूक राहा. तिथल्या संपूर्ण परिसरातील वातावरणाची, पाण्याची आणि पावसाची माहिती घेऊनच प्लॅन करा. चुकूनही नद्यांजवळ किंवा तलावांजवळ जाऊ नका.

भूस्खलन

पावसाळ्यात डोंगराळ भागात भूस्खलनाच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. तसेच, दरडी देखील कोसळतात. त्यामुळे, पावसाळ्यात भेट देण्यासाठी योग्य ठिकाण निवडा. तसेच, कोणतेही ठिकाण निवडण्यापूर्वी यासंदर्भात जागरूक राहा.

सेल्फी घेणे टाळा

अनेकदा लोक फिरायला जातात तेव्हा तिथल्या आठवणी राहाव्यात म्हणून फोटो, सेल्फी आणि व्हिडिओ काढतात. या सेल्फीच्या वेडापायी लोक कुठेही आणि कोणत्याही धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यास सुरूवात करतात.


परंतु, पावसाळ्यात अशा धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी घेणे चुकीचे आहे. यामुळे, तुमचा जाव देखील जाऊ शकतो. त्यामुळे, सेल्फी घेताना तुमच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायला विसरू नका. या दिवसांमध्ये चुकूनही डोंगराच्या कड्यावर, तलाव किंवा नद्यांच्या मध्यभागी सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT