Mood Swings esakal
लाइफस्टाइल

Mood Swings : हिवाळ्यातच जास्त मूड स्विंग्स का होतात?

महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त

Pooja Karande-Kadam

Mood Swings :

हिवाळा अनेकांना आवडतो. अंगाला बोचणाऱ्या थंडीत धुक्याला छेदत केलेली बाईक स्वारी, किंवा धुक्यात केलेला मॉर्निंग वॉक संस्मरणीय असतो. थंडीच्या दिवसात वॉकला जाणाऱ्यांची संख्या अफाट आहे. हा ऋतू साधारणपणे खूप आनंददायी आणि आरामदायी असतो.

पण हिवाळ्यातच अनेकदा मूड बिघडतो. प्रत्येक गोष्टीचा राग येतो. आजूबाजूचे सर्व काही वाईट वाटते. कधी कधी फक्त झोपून रहावे, शांत बसावे असे वाटते. पण असं का होतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हिवाळ्यात मुड स्विग्सचा सर्वात जास्त सामना करावा लागतो. याबद्दलच आपण डॉ. कमल किशोर वर्मा मानसोपचारतज्ज्ञ याच्याकडून अधिक माहिती घेऊयात. (Mental Health) 

सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर (एसएडी) म्हणजे काय?

ऋतूमानानुसार बदलणारे भावनिक विकाराचे लक्षण आहे. याला आपण हिवाळ्यातील उदासीनता म्हणू शकतो. म्हणजेच हिवाळा येताच लोकांचा मूड बदलू लागतो. हे सर्वांसोबत घडेलच असे नाही.

पण काही लोकांना मात्र नेहमीच, आळशीपणा, दुःख, एनर्जी कमी असणे, निराशा,तणाव अशा समस्या सतत येत राहतात. तर, असे लोक सामाजिक समारंभात किंवा कार्यालयीन मेळाव्यात सहभागी होत नाहीत.

धक्कादायक बाब म्हणजे, मूड बदलण्याच्या या आजाराचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे. महिलांना चेष्टेने म्हटलं जातं की, काय गं तुम्ही क्षणात चिडता अन् क्षणात नॉर्मल होता, हा या आजाराचाच भाग असू शकतो.  

हिवाळ्यातील मूड स्विंग्स का होतात?

हिवाळ्यात सूर्यप्रकाशाची कमतरता असते. तर सूर्यप्रकाश अनेकदा मूड सुधारण्याचे काम करतो. त्यामुळे थकवा कमी होतो आणि नकारात्मक विचार येत नाहीत. जेव्हा आपण सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येत नाही तेव्हा आपल्या मनःस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो.

सूर्यप्रकाशाअभावी शरीराच्या अंतर्गत घड्याळावर वाईट परिणाम होतो. पुरेशा सूर्यप्रकाशाशिवाय, तुमची सेरोटोनिनची पातळी कमी होऊ शकते. जेव्हा सेरोटोनिन कमी होते तेव्हा नैराश्य आणि निराशा उद्भवते.

संरक्षण कसे करावे

  1. झोपेचे योग्य नियोजन करा

  2. उन्हात बसा

  3. व्यायाम करा

  4. तुमच्या नित्यक्रमात ध्यानाचा समावेश करा.

  5. अंधारात, थंडी असलेल्या ठिकाणी जाणं टाळा

  6. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवा

  7. तुम्हाला पाहिजे ते करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT