लाइफस्टाइल

Moringa Powder : आडवी तिडवी सुटलेली ढेरी कमी करते या पानांची पावडर, जाणून घ्या मोरिंग्याचे पाणी पिण्याचे फायदे

शेवग्याचे पाणी तुम्ही घरी सहज तयार करू शकता

सकाळ डिजिटल टीम

Moringa Powder :

भारतीय आयुर्वेद शास्त्रात अनेक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींबद्दल सांगिले आहे. या औषधी वनस्पती आपल्या अनेक आजारांवर जालिम उपाय आहेत. त्यापैकीच एक आहे शेवग्याच्या शेंगांचे झाड.

शेवग्याच्या झाडाची पाने आकाराने छोटी आणि चवीला वेगळी असतात. या झाडाला मॉरिंगा ऑलिफेरा असेही म्हणतात. चव आणि पौष्टिकतेने समृद्ध शेवगा हे केवळ आरोग्यदायी अन्नच नाही तर त्याची फुले, पाने आणि फळे खूप फायदेशीर आहेत.

मोरिंगा पाणी हे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे, जे आरोग्यास अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. पोषक तत्वांनी युक्त मोरिंगा पाण्याचा आहारात दररोज सेवन केल्यास ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त मुबलक प्रमाणात असते. या पानात पालकापेक्षा तिप्पट लोह असते.

शेवग्याच्या पानांच्या पावडरीचे पाण्यातून सेवन केल्याने आरोग्यासाठी खूप फायदे होतात.  शेवग्याचे पानांचे पाणी अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध आहे आणि ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास आणि मुक्त रॅडिकल्सपासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते.

शेवग्याच्या पानांच्या पावडरीचे पाणी सेवन केल्याने वृध्दत्वाची लक्षणे दूर होतात तज्ज्ञांच्या मते, मोरिंगा पाणी सूज कमी करते. क्वेर्सेटिन आणि क्लोरोजेनिक ऍसिड सारख्या संयुगे समृद्ध असलेल्या मोरिंगा पाण्याचे नियमित सेवन केल्याने सूज कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करते

वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी शेवग्याची पावडर लाभदायी आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही डिटॉक्स वॉटर पित असाल तर आजपासून शेवग्याच्या पानांचा वापर करा. उठल्यानंतर शेवग्याच्या पावडर घातलेले कोमट पाण्याचे तुम्ही सेवन करा. ज्यामुळे आडवे-तिडवे सुटलेले पोट कमी होईल.

मधुमेहावर आहे गुणकारी

मधुमेही रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी रोज मोरिंगा पाण्याचे सेवन करावे. शेवग्याचे पाणी नैसर्गिकरित्या रक्तातील साखर सामान्य करते. मोरिंगाच्या पानांमध्ये आयसोथिओसायनेट नावाचे रासायनिक संयुग आढळते, जे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते.

शेवग्याच्या झाडांची हिरवी पाने क्लोरोफिलमध्ये समृद्ध आहेत. क्लोरोफिल त्याच्या डिटॉक्सिफिकेशन गुणधर्मांसाठी ओळखले जाते जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि शरीराला विषमुक्त करते.

शेवग्याचे पाणी कसे तयार करावे

शेवग्याचे पाणी तुम्ही घरी सहज तयार करू शकता. हे करण्यासाठी ताजी शेवग्याची पाने किंवा त्याची पावडर पाण्यात मिसळा. ही पाने शिजवून घ्या आणि नंतर गाळून घ्या. हे पाणीएक हायड्रेटिंग पेय आहे जे शरीराला हायड्रेट करते आणि शरीरातील अशुद्धता काढून टाकते. त्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात लिंबाचा रस घालून सेवन करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT