Morning Breakfast: Sakal
लाइफस्टाइल

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात बनवा पौष्टिक हरभरा-बीटपासून कटलेट, जाणून घ्या रेसिपी

Chana Beetroot Cutlet: सकाळच्या नाश्त्यात चहासोबत हरभरा-बीटपासून बनवलेले कटलेट खाल्ल्यास आनंद द्विगुणित होईल.

Puja Bonkile

Chana Beetroot Cutlet Recipe:   सकाळच्या नाश्त्यात पौष्टिक पदार्थ खाल्ल्यास दिवसभर शरीरात उर्जा राहते. तसेच सकाळी चहासोबत नाश्ता असल्यास आनंद द्विगुणित होतो. तुम्ही बटाट्यापासून बनवलेले कटलेट खाल्ले असेल पण हरभरा आणि बीटपासून बनवलेले कटलेट खाल्ले आहे का? नसेल तर आज जाणून घेऊया हे कटलेट कसे बनवायचे.

हरभरा-बीट कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१.५ कप उकडलेले हरभरे

१ मोठा उकडलेला बीट

१ छोटा कांदा

२-३ हिरव्या मिरच्या

१ तुकडा आलं

१/२ टीस्पून लाल तिखट

२ टीस्पून धने पावडर

१ टीस्पून चाट मसाले

कोथिंबीर

चवीनुसार मीठ

तळण्यासाठी तेल

हरभरा-बीट कटलेट बनवण्याची कृती

सर्वात आधी कुकरमध्ये हरभरा आणि बीट वेगळे वाफवून घ्यावे.

नंतर हरभरा, बीट, कांदा, हिरवी मिरची आणि आलं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.

हे मिश्रण एका भांड्यात काढा.

त्यात तिखट, धनेपूड, चाट मसाला , मीठ आणि कोथिंबीर घालून चांगे मिक्स करावे.

यानंतर गोल कटलेट तयार करा.

तव्यावर दोन्ही बाजून भाजून घ्यावे.

हिरवी चटणी आणि चहासोबत कटलेटचा आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT