Maggi Samosa Sakal
लाइफस्टाइल

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Maggi Samosa: रोज नाश्त्यात मॅगी खाऊन बोर झाले असाल तर मॅगी समोसा नक्की ट्राय करून पाहा.

Puja Bonkile

Maggi Samosa: जगात असे बरेच लोक आहेत ज्यांना सामान्यपेक्षा वेगळे काहीतरी खायला आवडते. प्रत्येकाच्या जेवणाची चव वेगळी असते आणि फक्त तोच ठरवू शकतो की काय आणि कसे खावे. पण अनेकवेळा अशा गोष्टी आपल्या समोर येतात, ज्या पाहून आपल्याला वाटते की हे काय विचित्र पदार्थ आहे? हे खायला कोणाला आवडते? सोशल मिडियावर मॅगीच्या अनेक रेसिपी व्हायरल होत असतात. त्यात एक मॅगी समोसा आहे. चला तर मग जाणून घेऊया मॅगी समोसा कसा बनवतात.

मॅगी समोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मैदा- 250 ग्रॅम

तेल - 3 चमचे

मीठ - चवीनुसार

मॅगी - 1 पॅकेट

पाणी - आवश्यकतेनुसार

मॅगी समोसा बनवण्याची कृती

मॅगी समोसा बनवण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात मैदा घ्या आणि त्यात मीठ आणि पाण्याच्या मदतीने मळून घ्या. नंतर मैदाचा घट्ट गोळा बनवा. नंतर पीठ मलमलच्या कापडाने झाकून अर्धा तास बाजूला ठेवा.

अर्ध्या तासानंतर मैद्याचे काही लहान आकाराचे गोळे लाटून घ्या. रोलिंग पिनच्या साहाय्याने ते आणखी सपाट करा आणि लहान गोल पुऱ्या करा. या गोल पुऱ्या मध्यभागी अर्ध्या कापून घ्या.

आता मॅगी नूडल्स वेगळ्या भांड्यात शिजवून घ्या. मॅगी शिजल्यावर ती एका भांड्यात काढून थंड होण्यासाठी ठेवा.

नंतर मॅगी भरून समोश्याचा आकार द्या.

नंतर कढईत तेल गरम करून समोसे सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. हिरवी चटणी किंवा केचप बरोबर सर्व्ह करा आणि गरमागरम मॅगी समोसा चा आनंद घ्या .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

TVKच्या नेत्याला पाठलाग करत क्रूरपणे संपवलं, कोयत्याने सपासप वार; मृत्यूनंतरही वार करतच राहिले, घटना CCTVत कैद

महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसणार मनोज बाजपेयी; १० किलो वजन घटवलं, नवा लूक पाहून चाहते शॉक

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Chinchwad Electricity ट्रान्सफर्मरला आग, चिंचवड, वाल्हेकरवाडीसह रावेत परिसरात वीजपुरवठा खंडित; आगीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT