Fries Recipe:  Sakal
लाइफस्टाइल

Fries Recipe: बटाटा न वापरताही बनवता येतात फ्राई, जाणून घ्या सोपी रेसिपी

Morning Breakfast: जर तुम्हाला असे वाटत असेल की फक्त बटाट्यापासून फ्राईज बनवता येतात तर तसे नसून आता अनेक पदार्थांपासून फ्राईज बनवता येतात.

पुजा बोनकिले

फ्रेंच फ्राईज खायला लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वाना आवडते. पावसाळा असो किंवा चहासोबत काहीही खाण्याची वेळ असो महिला घरच्या घरी फ्रेंच फ्राईज पटकन बनवतात. पण कधी कधी फ्रेंच फ्राईजमध्ये खूप तेल असते आणि तेलामुळे बटाटे मऊ होतात. जास्त तेल देखील आरोग्यासाठी हानिकारक असते. कारण वजन वाढण्यापासून ते कोलेस्ट्रॉल वाढण्यापर्यंत तेल आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे बरेच लोक ते खाणे टाळतात, पण आता तुम्हाला तसे करण्याची गरज नाही. कारण ब्रेडापासून देखील फ्राईज बनवता येतात.

लागणारे साहित्य

ब्रेडचे तुकडे - ४

लाल मिरची पावडर - 1 टीस्पून

काळी मिरी - 1 टीस्पून

मीठ - चवीनुसार

तेल- तळण्यासाठी

अंडयातील बलक - अर्धा कप

टोमॅटो सॉस - 1 कप

ब्रेड फ्राईज बनवण्याची कृती

सर्वात आधी वर नमूद केलेले साहित्य तयार करा आणि झाकून ठेवा. नंतर ब्रेडचे तुकडे बारीक चिरून घ्या.

ब्रेडचे तुकडे करून त्यात एक चमचा मैदा घालून मिक्स करा. गॅसवर तेल तापायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात ब्रेड टाकून तळून घ्या.

ब्रेड दोन्ही बाजूंनी तळून झाल्यावर एका भांड्यात काढा. आता त्यात लाल तिखट , मीठ, मिरपूड आणि उरलेले मसाले घालून मिक्स करा.

मिक्स केल्यानंतर ब्रेड फ्राईस मेयोनेझ आणि सॉससह सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT