Morning Breakfast Sakal
लाइफस्टाइल

Morning Breakfast: सकाळी उठायला उशीर झालाय? मग 10 मिनिटांत बनवा हेल्दी चीला, जाणून घ्या रेसिपी

Morning Breakfast: सकाळी उठायला उशीर झाला असेल तुम्ही गव्हाच्या पीठापासून 10 मिनिटांमध्ये चीला तयार करू शकता.

Puja Bonkile

morning breakfast try these healthy and tasty chilla

सकाळी सर्वांना ऑफिस, कॉलेज, शाळेला जाण्याची घाई असते. अनेकवेळा उशीरा उठल्यावर कोणता नाश्ता तयार करावा हे समजत नाही. अनेक लोक नाश्ता न करताच निघून जातात. सकाळी नाश्ता करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते. आज अशा पदार्थाबद्दल जाणून घेऊया जो 10 मिनिटांत बनवू शकता. गव्हाच्या पीठाचा चीला कसा बनवायचा हे जाणून घेऊया. यामध्ये प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते.

  • गव्हाच्या पीठाची चीला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

गव्हाचे पीठ

हळद

दही

ओवा

आलं

शिमला मिरची

गाजर

कांदा

हिरवी मिरची

कोथिंबीर

चवीनुसार मीठ

  • गव्हाच्या पीठाची चीला बनवण्याची कृती

गव्हाच्या पिठाचा चीला बनवण्यासाठी सर्वात पहिले एक वाटी पीठ घ्यावे. या पीठात मीठ, हळद आणि दही घालून मिक्स करावे. यानंतर पाणी घालून गुळगुळीत पीठ तयार करा. पीठ तयार झाल्यावर त्यात ओवा, बारिक आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि सर्व भाज्या घालून व्यवस्थित मिक्स करा. यानंतर गॅसवर पॅन तवा गरम करायला ठेवावे. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं तेल लावा म्हणजे तवा गुळगुळीत होईल. यानंतर मोठ्या चमच्याच्या साहाय्याने पीठ तव्यावर ओतून चीला बनवा. दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत शिजवा. शिजल्यावर हिरवी चटणी आणि केचप बरोबर सर्व्ह करा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT