Morning Tips: Sakal
लाइफस्टाइल

Morning Tips: केसांमधील गुंता कमी होण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

Morning Hair Care Tips: तुमचेही केस सकाळी उठल्यावर गुंतलेले असतात का? मग पुढील सोपे उपाय करू पाहा.

सकाळ डिजिटल टीम

Morning Hair Care Tips avoid tangled hair in morning

केसांचा गुंता काढणे सर्वात अवघड काम आहे. कधीकधी केस इतके गुंतात की ते मोकळे करणे खूप कठीण होते. अशावेळी केस तुटू देखील शकतात. साधारणपणे असे दिसून येते की अनेकदा सकाळी केस गुंतलेले असतात. जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमचे केस गुंतलेले असेल तर काही सोपे उपाय करू शकता.

गुंतलेल्या केसांमध्ये कंगवा करणे अवघड होते. यामुळे केस तुटतात. सकाळी ऑफिस, शाळा, कॉलेजला जाण्याची घाई असते. अशावेळी गुंतलेले केस मोकळे करण्यासाठी पुढील उपाय करू शकता.

  • कंगवा वापरावा

केसांमधील गुंता कमी करण्यासाठी कंगवा वापरावा. यामुळे केस लवकर मोकळे होतील. जर तुमचे केस दाट असतील तर रुंद दात असलेला कंगवा वापरू शकता. जर तुमचे केस खूप गुंतलेले असतील तर सर्वात पहिले तुमच्या बोटांच्या सहाय्याने केस मोकळे करावे. अन्यथा केस तुटू शकतात.

  • लीव्ह-इन कंडिशनर वापरा

जर तुम्हाला रोज सकाळी गुंतलेले केस मोकळे करायचे असेल तर लीव्ह-इन कंडिशनरचा वापर करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी केसांना लीव्ह-इन कंडिशनर लावावे. यामुळे केस गुंतण्याची समस्या कमी होऊ शकते.

  • केस बांधून ठेवावे

अनेक लोक झोपतांना केस मोकळे ठेऊन झोपतात. पण सकाळी उठल्यावर केस गुंतलेले दिसतात. केसांमधील गुंता काढणे अवघड होते. यामुळे केसांना मोकळे ठेऊ नका. यामुळे केस गुंतणार नाही.

  • उशीचे कव्हर बदलावे

केसांच्या समस्या दूर करण्यासाठी उशीची कव्हर बदलत राहावी. कॉटन पिलोकव्हर न वापरता सिल्कचे कव्हर वापरावे. कॉटन पिलोकव्हरमुळे केसांमधील नैसर्गिक ऑइल निघून जाते आणि केस कोरडे पडतात. यामुळे सिल्कचे कव्हर वापरावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

Latest Marathi News Live Update : धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत चर्चा नाही; राहुल गांधी यांचा आक्रमक पवित्रा

Vishnupuri Dam: प्रकल्प तहानलेलेच! विष्णुपुरीत ३३.४५ टक्के साठा

Bhokardan Theft: चहासाठी थांबल्या, नऊ लाख गेले; वाहनाची काच फोडून रक्कम लंपास, बचत गटाच्या महिलांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT