Benefits of Morning Sex  esakal
लाइफस्टाइल

Morning Sex : सकाळी सेक्स करण्याचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे

सकाळची वेळही साधारण अशी असते की तेव्हा आपल्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवणं खूप लाभदायक ठरतं.

सकाळ डिजिटल टीम

Benefits of Morning Sex : मॉर्निंग सेक्स या विषयावर सतत चर्चा होत असते, अनेकांचे याबाबत वेगवेगळी मतं आहेत. काही लोकांना रात्री सेक्स करायला आवडतं तर काही लोकं सकाळी सेक्स करतात, तशी सकाळची वेळही साधारण अशी असते की तेव्हा आपल्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवणं खूप लाभदायक ठरतं. जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई इथल्या मॅटनिर्टी आणि स्त्रीरोग सल्लागार डॉ. सुदेष्णा रे यांनी याबाबत बोलतांना सांगितले, “सर्वसाधारणपणे सेक्स केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आरोग्य, मानसिक आरोग्य, डिप्रेशन अशा गोष्टींवर फायदेशीर प्रभाव पडतो. सकाळी पुरुष आणि स्त्रिया दोघांचीही सेक्स हार्मोन्ससह हार्मोनल पातळी जास्त असते.

सकाळी सेक्स केल्याचे फायदे :

१. मूड बूस्टर

सेक्स दरम्यान ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन सारख्या हार्मोन्सच्या उत्सर्जनामुळे एखाद्याच्या मूडमध्ये त्वरित सुधारणा होऊ शकते, ज्यामुळे व्यक्ती मानसिकदृष्ट्या शांत होते. दिवसाच्या सुरुवातीला अशाने फायदा होतो, जरी झोप जरा कमी झाली असेल तरी दिवसभर एनर्जेटिक वाटते.

२. प्रतिकारशक्तीसाठी उत्तम

सकाळच्या वेळी सेक्स केल्याने शरीरात इम्युनोग्लोबुलिन ए (आयजीए) चे उत्पादन वाढू शकते, जे रोगप्रतिकारक कार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे, सकाळच्या वेळी सेक्स केल्याने प्रतिकारशक्ती सुधारु शकते.

३. स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते

सेक्समुळे शरीरात हार्मोन्सची वाढ होते ज्यामुळे मेंदू सक्रिय होऊ शकतो. सकाळी सेक्स करणे विशेषतः फायदेशीर ठरु शकते, कारण ते मेंदूला संपूर्ण दिवसभर शक्तीसाठी आवश्यक हार्मोनल बूस्ट प्रदान करु शकते.

४. व्यायाम करण्याची गरज नाही

शारीरिक संबंध ठेवल्याने कॅलरी बर्न होतात आणि सकाळचा व्यायाम याने तुम्ही स्कीप करु शकतात. दिवसाची सुरुवात करण्याचा हा एक उत्कृष्ट मार्ग बनतो. याव्यतिरिक्त, मॉर्निंग सेक्स स्नायूंना स्ट्रेच करण्यासाठी आणि आराम देण्यासाठी मदत करते.

५. कामवासना वाढते

रात्रभराच्या योग्य विश्रांतीनंतर, सकाळी शरीर नवीन सुरुवात करण्यासाठी तयार होते आणि यामुळे हार्मोन्सचे उत्पादन होऊ शकते, ज्यामुळे दिवसभर आनंद मिळतो. परिणामी आपली एनर्जी सुद्धा वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT