लाइफस्टाइल

Morning Walk Mistakes : मॉर्निंग वॉक करताना तुम्हीही करता का मोबाईलचा वापर? वाढू शकतात या समस्या

मॉर्निंग वॉक दरम्यान मोबाईल वापरणे हानिकारक...

Aishwarya Musale

मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे. वेगवेगळे काम करताना अनेकांना फोनवर गाणी ऐकण्याची सवय असते. फोनवर गाणे ऐकण्याची सवय एवढी वाढली आहे की मॉर्निंग वॉक करतानाही लोक मोबाईल वापरणे बंद करत नाहीत. मात्र या सवयीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

मॉर्निंग वॉक करताना मोबाईल वापरणे वाईट का आहे?

मोबाईलचे व्यसन आपल्याला इतके लागले आहे की मॉर्निंग वॉक करतानाही आपण त्याचा वापर करणे सोडत नाही, परंतु मॉर्निंग वॉक करताना असे करणे हानिकारक ठरू शकते. मॉर्निंग वॉक करताना मोबाईल का वापरू नये ते जाणून घेऊया.

1. बॉडी पोस्चर खराब होईल

सकाळी चालताना आपले लक्ष कंबर सरळ ठेवण्यावर असायला हवे, परंतु मोबाईल वापरताना आपल्याला नकळत थोडेसे वाकावे लागते, ज्यामुळे पाठीच्या कण्यावर परिणाम होतो आणि बॉडी पोस्चर देखील बिघडतो.

2. पाठदुखी होऊ शकते

मॉर्निंग वॉक करताना मोबाईल सतत बघाल तर, आपले बॉडी पोस्चर बिघडते जे नंतर पाठदुखीमध्ये बदलते, म्हणून चालताना मोबाईल फोन खिशात ठेवणे चांगले.

3. स्नायूंमध्ये वेदना होऊ शकते

जेव्हा आपण चालतो तेव्हा आपल्याला दोन्ही हात वर-खाली करावे लागतात, असे केल्याने आपल्या हाताच्या स्नायूंचा व्यायाम होतो, परंतु जेव्हा आपण एका हाताने मोबाईल वापरतो आणि दुसरा हात वर-खाली करतो तेव्हा स्नायूंचा समतोल बिघडतो.

4. एकाग्रतेचा अभाव

चालताना आपले सर्व लक्ष फक्त आपल्या शरीरावर असायला हवे. परंतु मोबाईलच्या वापरामुळे हे शक्य होत नाही. त्यामुळे मॉर्निंग वॉकदरम्यान मोबाईलचा वापर करणे टाळा. लक्षात ठेवा की कोणताही व्यायाम तुम्ही मनापासून कराल तेव्हाच तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

श्रीविद्या अन् सीमंतमच्या विधी! सामंथाला ओटीभरणीत चाळणीने अंघोळ का घातली? काय आहे परंपरा? Video

Markandeya Parvat Yatra Ban : मार्कंडेय गडावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही 'ब्रेक'; भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंतच प्रवेश, प्रशासनाचा निष्काळजीपणा?

SCROLL FOR NEXT