लाइफस्टाइल

सावधान: Morning Walk ला जाताना मोबाईल सोबत घेताय?

सकाळ डिजिटल टीम

लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकजण मोबाईल अॅडॅक्ट झालेले आहेत. सकाळी उठलं की पहिले मोबाईल हातात घेतला जातो. रात्री झोपेपर्यंत तो आपल्या सोबत असतो. मोबाईल म्हणजे आयुष्याचा एक भागच झाला आहे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर त्याचे नुकसान होतेच. आजकाल बरेचजण हेल्थ कॉन्शस झाले आहेत. सकाळी रोड वरती तुम्हाला बरेच लोकं फिरताना दिसतात. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या बहुतांशी लोकांच्या कानामध्ये हेडफोन पहायला मिळतो. मात्र याचे खूप मोठे नुकसान आपल्या शरीरावर होते. नेमके काय नुकसान होते जाणून घेऊया.

स्नायू लागतात दुखायला

मॉर्निंग वॉक करताना आपल्या संपूर्ण बॉडीचे एक्ससाइज होत असते अशा वेळेस एका हातात मोबाईल असेल तर आपल्या स्नायू असंतुलित होतात आणि वेदना होण्यास सुरुवात होते.

शरीराचा बदलतो आकार

मॉर्निंग वॉक करताना नेहमी एका सुरातच चालले पाहिजे. जर आपण एकाच पोझिशनमध्ये चालत असेल तर त्याचा दुसर्‍या स्नायू वरती परिणाम होतो आणि आपल्या शरीराचा आकार हळूहळू बदलण्यास सुरुवात होते. वजन कमी होईल मात्र शरीराच्या आकारमानात बदल होईल.

पाठीच्या दुखण्याची होते सुरुवात

आपण मोबाईलमध्ये बघत जर मॉर्निंग वॉक करत असेल तर मान आणि पाठीवर ताण पडून पाठीच्या वेदना सुरू होतात. याचे कारण एकाच पोझिशन मध्ये आपण चालत राहतो. याचा परीणाम मान आणि पाठीवर ताण पडतो आणि दुखणी सुरु होतात.

एकाग्रता कमी होते

मॉर्निंग वॉक करताना मोबाईल सोबत असेल तर आपले सगळे लक्ष मोबाईकडे असते. यामुळे वॉक करताना लक्ष नेहमी विचलीत होते. याचा परीणाम एकाग्रता कमी होण्यास सुरुवात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : पुण्यात प्रेशर मिड आणि प्लाझ्मा वर बंदी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा सुरू

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT