Mothers Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Mothers Day 2024 : आईच्या स्मार्टफोनमध्ये हे Apps आहेत का आत्ताच तपासा, तिला जास्त मदत होईल

मोबाईलमधील Apps मुळे आईची अनेक कामे सोप्पी होतील

सकाळ डिजिटल टीम

Mothers Day 2024 :  

पदराआड घेणारी अन् मोबाईल न वापरणारी आता इतिहासजमा झालीय अशी पोस्ट अनेक वेळा सोशल मिडियावर व्हायरल होत असते. प्रत्येकाला ते वाचून वाटलंही असेल की आत्ताच्या माता मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवतात. पण हाच मोबाईल महिलांच्या अनेक कामी येतो.

तुमची आई छोट्या मोठ्या कामासाठी सतत तुमची मदत घेत असेल. तर तिला स्मार्टफोन घेऊन द्या. आणि त्या फोनमध्ये काही स्पेशल Apps इंस्टॉल करून द्या. जे तिच्या अनेक कामात मदत करतील.

Online Shopping Apps

आजकाल शॉपिंग करणं हे घरात बसूनही होऊ शकतं. हे सगळ्यांनाच पटू लागलं आहे. कारण, जो तो ऑनलाईन शॉपिंग करताना दिसतो. मग अशा कामात आई का मागे पडावी. आईलाही तुम्ही असे Apps डाऊनलोड करून द्या. आणि तिला सुरक्षित शॉपिंग कसे करायचे याबद्दलही सांगा. (Mothers Day 2024 )

Online Food Delivery Apps

कधी-कधी घरी कोणी नसेल तेव्हा आई स्वत:साठी काहीच बनवत नाही. कारण, एकटीसाठी कुठे काय करत बसू असे सगळ्याच माता म्हणतात. तुमची आईही असेच करत असेल तर तिला फूड डिलिव्हरी ऍप्सची जास्त गरज आहे. तिला ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या चांगल्या Apps बद्दल माहिती द्या. त्यावर कसे पदार्थ मागवायचे, त्यावर चांगले वाईट रिव्ह्यू कसे द्यायचे याबद्दल शिकवा.

Messaging Apps

आजकाल प्रत्येकाशी फोनवर बोलणे, भेटणे होत नाही. पण ऑनलाईनच्या जमान्यात आई मागे पडू नये यासाठी आईला मॅसेजिंग ऍप डाऊनलोड करून द्या. त्यावर तिच्या माहेरचे, मैत्रिणींचे ग्रूप असतील. तर त्यात तिला Add करा. स्टेटस, मॅसेज कसे पाठवायचे हेही तिला सांगा.

Safety Apps

आजकाल महिलांवर होणारे अत्याचार वाढले आहेत. बालिका असो वा ६०-७० वर्षाची आजी तिच्यावरही अत्याचार होत आहे. त्यामुळे अनेक महिला-मुली आजही रात्रीच्यावेळी घराबाहेर पडण्यास नकार देतात. त्यावर My Safetipin, I’m Safe असे सुरक्षा Apps आहेत. ज्याचा वापर करून अनेक महिला अडचणींची सुचना जवळच्या व्यक्तींना देतात. आणि तात्काळ मदतही उपलब्ध करून देतात.

Cab Apps

कडक उन्हाळ्यात सार्वजनिक गाडीने प्रवास करणे डोकेदुखी ठरते. कारण, उकाड्याने जीव कासाविस झालेला असतो. अशावेळी काही कामासाठी आईला घराबाहेर पडायचे असेल तर कॅब हवी. यासाठी तिला कंपनीचे Apps डाऊनलोड करून द्या,कारण यावरून ती कधीही कॅब बुक करेल. हे तिच्यासाठी सोपे ठरेल.

Health Apps

आजकाल अनेक Apps महिलांसाठी बनवण्यात आले आहेत. जे महिलांना वाढलेलं वजन कमी करणे, आरोग्यासाठी फायद्याच्या काही रेसिपीज दाखवत असतं. तसेच, मधुमेह, वजन वाढणे-कमी करणे, हृदयविकार अशा अनेक आजारांची माहिती आणि त्यावर उपायही देत असते.

स्मार्ट पेमेंट्स Apps

आजकाल क्यूआर कोड स्कॅन केला की आपोआप पेमेंट होतं. याचं आईला भलतच कौतुक वाटत असतं. सगळे जग डिजिटल पेमेंट करत असताना आईला का मागे ठेवता. आईलाही डिजिटल पेमेंट करायला शिकवा. यामुळे, सतत पैसे सोबत ठेऊन जीव धोक्यात घालण्याची, पैसे हरवण्याची,चोरीला जाण्याची भिती नसते.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

SCROLL FOR NEXT