mumbai police shared funny post  
लाइफस्टाइल

'पिझ्झासोबत अननस चालेल, पण...'; मुंबई पोलिसांचं मास्कवरील भन्नाट ट्विट व्हायरल

शर्वरी जोशी

करोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही त्यामुळे प्रशासन किंवा अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी वारंवार नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. यामध्येच मुंबई पोलीसदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करत आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना सुरक्षेच्या नियमांबद्दल जागरुक केलं आहे. यामध्येच पुन्हा मुंबई पोलिसांनी एक भन्नाट ट्विट केलं आहे. सध्याच्या काळात मास्क लावणं कशा पद्धतीने गरजेचं आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.  यासाठी त्यांनी कोणत्याही पदार्थांचं कॉम्बिनेशन करु खा परंतु, करोनाच्या काळात आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा करु नका, हे सांगितलं आहे.

मुंबई पोलिसांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी प्लिझासोबत अननस खा, अॅव्हॉकॅडोसोबत चॉकलेट खा,बिर्याणीमध्ये वेलची घालूनदेखील खा. परंतु, नाक आणि तोंड याच्यावरील मास्क मात्र खालती करु नका, असं सांगितलं आहे. त्यांच्या या पोस्टमधून त्यांनी एक खास संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. वरील कोणत्याही पदार्थाबाबत विविध प्रयोग केले तरी चालतील. मात्र, करोना काळात तोंडावरील मास्क हटवण्याचा प्रयत्न करु नका हे सांगण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी केला आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी पोस्ट केलेले हे ट्विट सोशल मीडियावर चर्चिलं जात असून आतापर्यंत ५ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. मुंबई पोलीस सोशल मीडियावर सक्रीय असल्यामुळे ते सातत्याने जनजागृतीचं काम करत असतात. अलिकडेच त्यांनी अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील बबड्यावर आधारित एक मीम शेअर करत नागरिकांना करोना काळात सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

SCROLL FOR NEXT