लाइफस्टाइल

Mumbai Health News : हवामान बदलामुळे मुंबईकरांना 'ब्रॉन्काइटिस'चा धोका, अशी घ्या स्वतःची काळजी

हवामान बदलामुळे मुंबईकरांना 'ब्रॉन्काइटिस'चा धोका...

Aishwarya Musale

शहरातील तापमानाचा पारा आता हळूहळू उतरत आहे. त्यामुळे थंडीला सुरुवात झाल्याने शहरातील सर्वच भागांत सकाळी व सायंकाळी गारठा वाढत आहे. शहरातील हवेची गुणवत्ता ढासळल्याने प्रदूषणात वाढ होत आहे.

या दोन्हींचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, सर्दी-खोकल्याच्या रुग्णांत मोठी वाढ झालेली आहे. परिणामी, श्‍वस‍नाच्या आजाराबरोबरच ब्रॉन्काइटिसचाही त्रास वाढत आहे.

वाढत्या प्रदूषणाचा फटका

लहान मुले, तरुण व वृद्धांमध्येही खोकल्याचे प्रमाण दिसून येत आहे. सर्दी-खोकला बऱ्याच कालावधीपर्यंत औषधोपचार घेऊनही बरा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. खराब हवामान व प्रदूषणामुळे सध्या नागरिकांमध्ये श्‍वस‍नाच्या आजाराबरोबरच व ब्रॉन्काइटिसचाही त्रास वाढत आहे. रोगप्रतिकारक क्षमता कमी असणाऱ्या नागरिकांमध्ये हा त्रास प्रामुख्याने आढळून येत आहे.

जेव्हा खोकला तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक असतो, तेव्हा त्याला ‘अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन’ असे म्हटले जाते. या प्रकारचा खोकला कोरड्या प्रकारचा असतो. अशा वेळी रुग्णाला साध्या खोकल्याच्या औषधे दिली जातात. चार ते पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस खोकला राहिल्यास ब्रॉन्काइटिसचा धोका असू शकतो. त्यासाठी वेळीच काळजी घ्यावी, असे तज्ज्ञांनी सांगितले.

लक्षणे काय?

एक ते दोन आठवडे खोकला राहणे, खोकल्याची तीव्र उबळ , येणे, दम लागणे, खोकल्यातून कफ पडणे. ही लक्षणे आहेत.

कोणाला होऊ शकतो?

लहान मुले व ज्येष्ठ नागरिक, धुळीत किंवा उघड्यावर काम करणारे नागरिक, रोगप्रतिकारक क्षमता कमी असणारे नागरिक, या लोकांना होऊ शकतो.

काय काळजी घ्यावी?

बाहेर पडताना मास्क वापरावा, थंड पदार्थांचे सेवन टाळावे, रोगप्रतिकारक क्षमता उत्तम राहील याची काळजी घ्यावी, धूम्रपान टाळावे.

काय उपाय करावे?

खोकला जास्त दिवस राहिल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत, खोकला झाल्यावर नियमित वाफ घ्यावी, पाणी जास्त प्यावे, संतुलित आहार घ्यावा, ॲलर्जी असणाऱ्या गोष्टी टाळाव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT