Nag Panchami 2024 Sakal
लाइफस्टाइल

Nag Panchami: नागपंचमीला पूजा करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, नागदेवता होतील प्रसन्न

Nag Panchami 2024: नागपंचमीला नागदेवतेची मनोभावे पूजा केल्यास सर्पदोषापासून सुटका मिळते. तसेच पूजेदरम्यान काही चुका झाल्यास जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Puja Bonkile

Nag Panchami 2024: श्रावण महिन्यात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील शुल्क पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची मनोभावे पुजा केल्यास सर्पदोषापासून मुक्ती मिळते. तसेच घरातील अनेक समस्या दूर होतात. नागदेवतेची पूजा करताना दूध आणि लाह्या अर्पण करणे शुभ मानले जाते. पण नागपंचमीला पूजा करताना काही चुक झाल्यास जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे पूजेदरम्यान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.

नागपंचमीला पूजा करताना पुढील गोष्टी ठेवा लक्षात

  • नागपंचमीला सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ कपडे परिधान करून पूजा करावी. या दिवशी नागदेवतेचे दुधाने अभिषेक करावा आणि जीवनात सुख-शांती मिळावी यासाठी प्रार्थना करावी. असे मानले जाते की राहू आणि केतूशी संबंधित दोष दूर होतात.

  • नागपंचमीला चांदीच्या नागाची मुर्ती दान केल्याने कामातील अडथळे दूर होतात आणि सर्पदोषापासून मुक्ती मिळते. याशिवाय नागदेवतेचा आशीर्वाद देखील मिळतो.

  • नागपंचमीच्या दिवशी नागदेवता आणि शिवलिंगाला दूध अर्पण करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका. दूध अर्पण करण्यासाठी पितळेचे भांडे वापरणे शुभ मानले जाते.

  • तसेच नागपंचमीला धारदार वस्तू वापरणे टाळा. यामुळे नागदेवता नाराज होऊ शकतात.

  • नागपंचमीला नागदेवतेची पूजा करताना दूध अर्पण करावे. यामुळे भीती दूर होते आणि कुटुंबातील सदस्यांना आनंद आणि शांती मिळते. तसेच लाह्याचा प्रसाद दाखवावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayor Manjusha Nagpure : पुणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये! शहर तुंबल्यानंतर महापौरांनी प्रशासनाला घेतले फैलावर, 'या' 227 ठिकाणांसाठी नवा प्लॅन

Mahakal the Master of time: जगाची वेळ बदलणार का? उज्जैनमधून 'महाकाल टाइम'चा नवा दावा, ग्रीनविचला आव्हान!

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु !'सावनी रेकॉर्डझ्' या म्युझिक लेबलची घोषणा; पहिलं गाणंही केलं रिलीज

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT