Nag Panchami Date 2023 sakal
लाइफस्टाइल

Nag Panchami 2023 : नागपंचमीचा सण कधी केला जाणार साजरा?, जाणून घ्या पूजेची तारीख व शुभ मुहूर्त

Nag Panchami Date 2023 : नागपंचमीचा सण साजरा करण्यासाठी शुभ मुहूर्ताबाबतची माहिती जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

श्रावण म्हणजे व्रतवैकल्ये आणि उत्सव-सणांचा महिना. श्रावण महिन्यातील देवीदेवतांची पूजा, उपवास, मंगळागौर, श्रावणी सोमवार-शनिवारी, सण-उत्सव, महादेवाची पूजा या सर्व गोष्टीस हिंदू परंपरेत खूप महत्त्व आहे. 

यापैकीच एक महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. हिंदू धर्मातील पौराणिक कथांमध्ये सापांचे महत्त्वपूर्ण असे स्थान आहे. नागपंचमी हा नागदेवतेची पूजा करण्याचा एक पारंपरिक सण आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जाणारा नागपंचमी हा एक अनोखा सण आहे. कारण या दिवशी नागांची मनोभावे पूजा केली जाते. 

भाविक या दिवशी उपवास देखील करतात. नागपंचमीचे व्रत केल्याने आणि व्रत कथा वाचल्याने शुभ फळ मिळते, असे मानले जाते. आठ नागांना या व्रताचे देवता मानले जाते. या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट आणि शंख या आठ नागांची पूजा केली जाते. यंदा  नागपंचमीचा सण 21 ऑगस्ट म्हणजेच सोमवारी साजरा केला जाणार आहे.

नागपंचमी सणाचा शुभ मुहूर्त

  • नागपंचमी सणाची तारीख-  21 ऑगस्ट, सोमवार 

  • नाग पंचमी पूजेचा शुभ मुहूर्त - पहाटे 5 वाजून 53 मिनिटांपासून ते सकाळी 8 वाजून 30 मिनिटांपर्यंत  

  • नागपंचमी तिथीची समाप्ती - 22 ऑगस्ट 2023 रोजी मंगळवार दुपारी 2:00 वाजता होईल 

नागपंचमी सणाची पूजा करण्याची योग्य पद्धत

  • पंचमीच्या एक दिवस आधी म्हणजेच चतुर्थीच्या दिवशी एकदाच भोजन करावे. 

  • पंचमीच्या दिवशी उपवास ठेवावा. या दिवशी संध्याकाळी उपवास सोडावा. 

  • पूजा करण्यासाठी लाकडी पाटावर नागाची प्रतिमा किंवा नागाची मातीची मूर्ती स्थापित करावी.

  • यानंतर त्यावर हळद, रोळी, अक्षता आणि फुले अर्पण करून नागदेवतेची पूजा करावी.

  • नागदेवतेला कच्चे दूध, तूप आणि साखर अर्पण करावे. 

  • पूजा केल्यानंतर नागदेवतेची आरती करावी. शेवटी नागपंचमीची व्रत कथा नक्की ऐकावी. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT