Narak Chaturdashi  sakal
लाइफस्टाइल

Narak Chaturdashi 2023: दिवाळीच्या पूर्वी छोटी दिवाळी का साजरी करतात, त्यामागील कारणं जाणून घ्या

आज छोटी दिवाळी, असे आहे या सणाचे धार्मिक महत्त्व

Aishwarya Musale

नरक चतुर्थी हा सण आपण दरवर्षी दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी व धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करीत असतो. नरक चतुर्थीच्या दिवशी  या दिवशी भगवान विष्णूचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध केला होता. आणि तेव्हापासून दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी आपण नरक चतुर्थी साजरी करीत असतो.

नरक चतुर्थी या सणापासून आपल्याला स्वतःच्या सुखापेक्षा इतरांची सुख आणि त्याचा आनंद नेहमी शीर्षस्थानी असावा अशी शिकवण मिळत आहे. नरक चतुर्दशी हा दीपावली या सणाचा दुसरा दिवस आहे. दीपावली या सणांमध्ये असणाऱ्या पाच दिवसांपैकी नरक चतुर्थी या दिवसाला खूप महत्त्व आहे. नरक चतुर्थीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व आहे. नरक चतुर्थीच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्यात येते.

यंदा नरक चतुर्दशी 11 आणि 12 नोव्हेंबरला साजरी केली जात आहे. या वर्षी ही तारीख 11 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 01:57 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 12 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 02:44 वाजता संपेल. छोटी दिवाळीसाठी प्रदोष काल 11 नोव्हेंबरला प्राप्त होत आहे, त्यामुळे 11 नोव्हेंबरला छोटी दिवाळी साजरी केली जात आहे.

नरक चतुर्दशीला रूप चौदस किंवा छोटी दिवाळी असेही म्हणतात. छोटी दिवाळी हा सण दीपोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपली घरे स्वच्छ करतात आणि दिवे लावून उत्सव साजरा करतात. असे म्हणतात की या दिवसापासून घरात लक्ष्मीचे आगमन होते. पण नरक चतुर्दशी साजरी करण्यामागे एक खास कारण आहे. चला जाणून घेऊया नरक चतुर्दशी का साजरी केली जाते आणि तिला छोटी दिवाळी का म्हणतात?

नरक चतुर्दशी कधी साजरी केली जाते?

दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. नरक चतुर्दशी हा सण धनत्रयोदशीच्या एक दिवसानंतर आणि दिवाळीच्या एक दिवस आधी येतो. यावेळी नरक चतुर्दशीची तारीख ११ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर पर्यंत आहे. त्यामुळे हा सण दोन्ही दिवशी साजरा केला जाऊ शकतो.

छोटी दिवाळीला नरक चतुर्दशी का म्हणतात?

या दिवशी भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध केला होता असे मानले जाते. नरकासुराच्या कारागृहात कैद असलेल्या १६ हजारांहून अधिक महिलांना श्रीकृष्णाने मुक्त केले होते. तेव्हापासून छोटी दिवाळी ही नरक चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते.

छोटी दिवाळी कशी साजरी करावी?

नरक चतुर्दशीच्या दिवशी घराची स्वच्छता आणि सजावट केली जाते. घरातील रद्दी आणि खराब झालेल्या वस्तू बाहेर काढल्या जातात. संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही कोपऱ्यांवर दिवे लावले जातात आणि लक्ष्मीची पूजा केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: विराट कोहलीचा चौकार अन् मोडला राहुल द्रविडच्या नावावरील मोठा विक्रम! इंग्लंडमध्येही ठरला 'किंग'

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

भारतातून OnePlus ची एक्झिट? 2027 पर्यंत कंपनी बंद होणार असल्याची चर्चा; ज्यांच्याकडे आत्ता मोबाईल आहे त्यांनी काय करायचं? वाचा

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडी कायम

Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT