National Chartered Accountants Day 2024 esakal
लाइफस्टाइल

National Chartered Accountants Day 2024 : भारतातील यशस्वी CA, कुणी आहे मंत्री तर कुणी आहे उद्योगपती.!

National Chartered Accountants Day 2024 : भारतात दरवर्षी १ जुलै हा दिवस राष्ट्रीय चार्टर्ड अकाऊटंट दिवस म्हणून साजरा केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

National Chartered Accountants Day 2024 : भारतात दरवर्षी १ जुलै हा दिवस राष्ट्रीय चार्टर्ड अकाऊटंट दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी भारतीय चार्टर्ड अकाऊटंट्सची संस्था ICAI (Institute of Chartered Accountants of India – ICAI) १ जुलै १९४९ मध्ये संसदेच्या एका कायद्याद्वारे अस्तित्वात आली होती. त्यामुळे, आजचा दिवस हा ‘राष्ट्रीय चार्टर्ड अकाऊटंट’ दिवस म्हणून साजरा केला जातो.

आपल्या देशात केवळ काही जुन्या व्यावसायिक संस्था आहेत. ज्यात ICAI समाविष्ट आहे. ICAI चे अंदाजे अडीच लाख सदस्य आहेत. ज्यामुळे, सदस्याच्या बाबतीत ही जगातील दुसरी सर्वात मोठी व्यावसायिक लेखा आणि वित्त संस्था बनली आहे.

चार्टर्ड अकाऊटंटचे आपल्या देशासाठी भरीव योगदान आहे. या योगदानासाठी देखील हा दिवस ओळखला जातो. आज आपण राष्ट्रीय चार्टर्ड अकाऊटंट दिनानिमित्त देशातील काही दिग्गज चार्टर्ड अकाऊटंटबद्दल जाणून घेणार आहोत. जे आज विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत.

राकेश झुनझुनवाला

राकेश झुनझुनवाला हे प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊटंट असून त्यांना ‘भारताचे वॉरेन बफेट’ म्हणून ही ओळखले जाते. त्यांनी या क्षेत्रात मोठा सन्मान प्राप्त केला आहे. झुनझुनवाला एक भारतीय अब्जाधीश, शेअरमार्केट ट्रेडर आणि गुंतवणूकदार आहेत.

राकेश झुनझुनवाला

त्यांच्याकडे तब्बल ४५ हजार करोडपेक्षा अधिकची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले आहेत.

नैना लाल किदवाई

नैना लाल किदवाई या एक भारतीय बॅंकर, चार्टर्ड अकाऊटंट आणि बिझनेस एक्झिक्यूटिव्ह आहेत. महत्वाची बाब म्हणजे त्या HSBC इंडिया (Hong Kong आणि Shanghai Banking Corporation) च्या कंट्री हेड आणि ग्रुप जनरल मॅनेजर आहेत.

नैना लाल किदवाई

विशेष म्हणजे प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून पदवीधर झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिल्या होत्या. त्यामुळे, भारतातील कित्येक महिलांसाठी त्या प्रेरणास्थान आहेत. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

पियूष गोयल

तुमच्यातील अनेकांना हे कदाचित माहित नसेल की, भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री पियूष गोयल हे देखील सीए आहेत. त्यांनी सरकारमध्ये अनेक मोठ्या पदांवर काम केले असून त्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड देखील उत्कृष्ट राहिले आहे.

विशेष म्हणजे त्यांनी चार्टर्ड अकाऊटंन्सीच्या अभ्यासक्रमात दुसरा क्रमांक मिळवला होता. मुंबई विद्यापीठाच्या कायद्याच्या परीक्षेतही ते टॉपर राहिले आहेत.

कुमार मंगलम बिर्ला

कुमार मंगलम बिर्ला हे आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आहेत. भारतातील सर्वात मोठ्या आणि जागतिक समूहांपैकी एक असलेल्या या बिर्ला समूहासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.

कुमार बिर्ला हे एक उत्कृष्ट सीए असून त्यांनी लंडन बिझनेस कॉलेजमधून एमबीए केले आहे. हे फार कमी लोकांना माहित असेल. समाजातील दुर्बल घटकांसाठी ते सतत कार्यरत असतात. चांगल्या आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांसाठी ते नियमितपणे योगदान देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

SCROLL FOR NEXT