National Doctor's Day 2025 Wishes in Marathi sakal
लाइफस्टाइल

National Doctor's Day 2025 Wishes: डॉक्टर्स डे निमित्त आपल्या लाडक्या डॉक्टरांना मराठीतून शुभेच्छा द्या अन् थँक यू म्हणा!

Best Marathi wishes for National Doctor's Day 2025: डॉक्टर्स डे निमित्त आपल्या लाडक्या डॉक्टरांना द्या मराठीतून खास शुभेच्छा!

Anushka Tapshalkar

Thank you messages for doctors in Marathi: भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे दरवर्षी १ जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस देशातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवा, माया आणि समर्पणाचा गौरव करण्यासाठी आहे. समाजाच्या आरोग्याची जबाबदारी उचलून, स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता अनेकदा सतत सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या योगदानाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

हा दिवस खास बनवण्यासाठी, आपल्या आयुष्यातील डॉक्टरांना मनापासून धन्यवाद देण्यासाठी काही सुंदर, भावनिक शुभेच्छा संदेश आम्ही पुढे शेअर केले आहेत. ते वापरून तुमच्या जवळच्या आणि लाडक्या डॉक्टरांना नक्की थँक यू म्हणा.

का साजरा केला जातो डॉक्टर्स डे?

राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा करायला 1991 साली सुरूवात झाली. हा दिवस सुप्रसिद्ध डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विशेष म्हणजे १ जुलै हा त्यांच्या जन्म आणि निधन म्हणजेच पुण्यतिथी दिवस आहे.

डॉ. रॉय यांनी IMA (Indian Medical Association) आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया स्थापन करण्यात मोलाचे योगदान दिले. 1961 साली त्यांना त्यांच्या मौल्यवान कामगिरीसाठी भारतरत्न पुरस्कार मिळाला. त्यांच्या कार्याची आठवण ठेवत हा दिवस डॉक्टरांच्या सेवेचे कौतुक करण्यासाठी साजरा केला जातो.

आजच्या दिवशी अनेक हॉस्पिटल्स, मेडिकल कॉलेज, आणि आरोग्य संस्थांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, तर काही ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात येत आहेत.

डॉक्टर्स डे शुभेच्छा

- जीवनाच्या प्रत्येक संकटात आधार बनणाऱ्या देवदूतांना – डॉक्टरांना डॉक्टर्स डेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

- आपल्या निःस्वार्थ सेवेमुळे हजारो जिवांना नवसंजीवनी देणाऱ्या सर्व डॉक्टरांना सलाम! डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

- रुग्णांचा केवळ आजार नाही, तर त्यांची आशाही बरी करणारे हात म्हणजे डॉक्टर! तुम्हाला डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा!

- तुमची एक वेळची सेवा कोणाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते – अशीच सेवा करत राहा! Happy Doctors’ Day!

- पांढऱ्या कोटातले खरे हिरो – डॉक्टर! तुमच्या समर्पणाला आमचा मानाचा मुजरा! डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा!

- तुम्ही दिलेली काळजी आणि विश्वासामुळे अनेकांना जगण्याची नवी दिशा मिळते. डॉक्टरांना सलाम!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात! 'ऑपरेशन महादेव'मध्ये ठार दहशतवाद्याची 'पीओके'मध्ये काढली अंत्ययात्रा, भारतीयांचा संताप

ChatGPT Leak : अलर्ट! ChatGPT वरील तुमचा पर्सनल संवाद गुगल सर्चवर लीक; पटकन बंद करून घ्या 'ही' सेटिंग नाहीतर सगळी माहिती चोरी होणार

Video Viral: जिल्हा परिषद शाळेचा गणू... गुगल मॅपलाही हरवणारा प्रवास! हसवणारी सुरुवात, रडवणारा शेवट... व्हिडिओ चुकवू नका

Latest Marathi News Updates Live : महादेवी हत्तीला परत द्या, या मागणीसाठी मंगळवेढ्यात अनोखा संदेश

Satej Patil : राहिले ते निष्ठावंत, गेले ते लाभार्थी.., हे सगळं ‘गोकुळ’दूध संघासाठी, करवीरच्या राजकारणावर सतेज पाटील ही म्हणाले...

SCROLL FOR NEXT