National Handloom Day 2024 esakal
लाइफस्टाइल

National Handloom Day 2024 : पार्टीवेअर साड्यांच्या जमान्यात handloom ची वाढती क्रेझ, तुमच्याकडे आहेत का या साड्या?

National Handloom Day 2024 : आज देशभरात ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ (National Handloom Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Monika Lonkar –Kumbhar

National Handloom Day 2024 : हातमाग हा व्यवसाय भारतात फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. हातमागावरच्या साड्या महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. या हातमागच्या साड्या तयार करण्यासाठी विणकरांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आज देशभरात ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ (National Handloom Day)  मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

देशातील हातमाग व्यवसायाला आणि कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतात दरवर्षी ७ ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो. साडी हा पोशाख प्रत्येक महिलेला आवडतो. साडी हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. हातमागाच्या साड्या तर प्रत्येक महिलेवर खुलून दिसतात.

आजच्या या हातमाग दिनानिमित्त तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये हातमागच्या काही सुंदर साड्या समाविष्ट करू शकता. आज आम्ही तुम्हाला देशातील सुप्रसिद्ध अशा हातमागच्या साड्यांबद्दल सांगणार आहोत. ज्यांचा समावेश प्रत्येक महिलेने तिच्या कलेक्शनमध्ये करायलाच हवा.

चंदेरी सिल्क

जर तुम्हाला लाईट रंगाच्या साड्या आवडत असतील तर, तुम्ही चंदेरी सिल्क या साडीचा समावेश तुमच्या वॉर्डरोबमध्ये करू शकता. ही साडी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. या साडीमध्ये पेस्टल आणि लाईड शेड्सचे रंग पाहायला मिळतात. चंदेरी साड्या या मध्यप्रदेशमध्ये बनवल्या जातात.

vidya Balan in chanderi Silk

या साड्यांवर सोन्या-चांदीचे काम पाहायला मिळते. विशेष म्हणजे या साडीचा पोत हलका असल्यामुळे, तुम्ही ही साडी कोणत्याही कार्यक्रमाला सहजपणे कॅरी करू शकता. या साड्या फारशा महाग नसून तुम्हाला त्या मार्केटमध्ये सहज मिळू शकतील.

पैठणी

पैठणी या साडीला तब्बल १०० वर्षांचा प्राचीन इतिहास लाभला आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये ही साडी सर्वात प्रथम विणण्यात आली होती. त्यामुळे, या साडीचे नाव पैठणवरून 'पैठणी' असे पडले. सातवाहन काळात या साड्यांना मोठी मागणी होती. त्यानंतर, पेशव्यांच्या काळात या पैठणी साडीची मोठी भरभराट झाली होती.

अशी ही पैठणी साडी प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवी. सिल्क आणि पारंपारिक जरीवर्कमध्ये ही पैठणी हातामागावर तयार होण्यासाठी १८ ते २४ महिने लागतात. या पैठणीसाडीमध्ये नानविध डिझाईन्स आणि पॅटर्न्स पाहायला मिळतात. ही पैठणी साडी ८ हजारांपासून ते लाखांपर्यंत मिळते.

कांजीवरम

कांजीवरम या साडीचे नाव तुम्ही अनेकदा ऐकले असेल. ही साडी दाक्षिणात्य राज्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. खास करून नववधूंना ही साडी क्लास दिसते. त्यामुळे, आजकाल अनेक तरूणी त्यांच्या लग्नात किंवा लग्नानंतरच्या एखाद्या कार्यक्रमाला ही कांजीवरम साडी नेसतात.

कांजीवरम साडी

या साडीवर मिनिमल मेकअप आणि मिनिमल ज्वेलरी लूक कॅऱी करायला विसरू नका. ही कांजीवरम साडी सिल्कपासून बनवली जाते. या साड्यांची किंमत हजारांपासून ते लाखांपर्यंत आहे.

पटोला साडी

पटोला साडी ही गुजरात राज्यातील पाटन जिल्ह्यात तयार केली जाते. त्यामुळे, या साडीला पाटन पटोला साडी असे ही म्हटले जाते.

patola saree

ही साडी तयार करण्यासाठी जवळपास ३-४ महिनांचा कालावधी लागतो. ही साडी तुम्हाला मार्केटमध्ये ३ हजारांपासून ते १ लाखांपर्यंत मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT