National Parents Day 2024 Sakal
लाइफस्टाइल

National Parents Day 2024: 'या' प्रकारे सुधारा पालकांशी नातं, टळतील मतभेद

National Parents Day 2024: आजकालच्या धावपळीच्या जीवनात मुलांना पालकांसाठी वेळ नाही. यामुळे नात्यात दुरावा वाढत आहे. अशापरिस्थितीत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

पुजा बोनकिले

National Parents Day 2024: पालकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २८ जुलैला राष्ट्रीय पालक दिन साजरा केला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात आई-वडीलांचे स्थान असते. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक मोठ्या निर्णयामध्ये त्यांची महत्वाची भूमिका असते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात मुलांना पालकांसाठी वेळ नाही. यामुळे नात्यात दुरावा वाढत आहे. अशापरिस्थितीत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

प्रेम व्यक्त करा

पालक दिनानिमित्त मुलांनी त्यांचे प्रेम व्यक्त करावे. अनेक मुले मोठे झाल्यावर आई वडिलांसमोर प्रेम व्यक्त करत नाही. तुम्ही आई वडिलांची काळजी करता, आदर करता हे वागण्यातून दिसू द्या.

पालकांना प्रेमाने समजावे

जर तुम्ही पालकांशी सहमत नसाल तर नम्रतेने बोलावे आणि त्यांना समजावू सांगावे. यामुळे वाद होऊन नात्यात दुरावा येणार नाही.

सण-उत्सव सोबत साजरे करा

तुम्ही जर नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी घरापासून दूर राहत असाल तर दिवाळी, दसरा यासारख्या उत्सावासाठी घरी येऊ शकता. यामुळे तुम्हाला आणि पालकांना देखील चांगले वाटेल.

अहंकार मागे ठेवा

मुलांनी मोठे झाल्यावर अहंकार बाळगू नये. पालकांना समजून घ्यावे. त्यांना शांतपणे तुमचे म्हणणे समजून सांगावे. यामुळे नात्यात आपुलकी वाढेल.

वेळ काढून पालकांशी बोलावे

तुम्ही घरापासून आणि पालकांपासून दूर राहत असाल तर या दिनानिमित्त पालकांना फोन करून शुभेच्छा देऊ शकता. सुट्टीचा दिवस रविवार असल्याने पालकांना वेळ देऊ शकता. त्यांना फिरायला घेऊन जा आणि मिनमोकळेपणाने गप्पा मारा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT