National Parents Day 2024 esakal
लाइफस्टाइल

National Parents Day 2024 : राष्ट्रीय पालक दिनानिमित्त भारतातील 'ही' बेस्ट ठिकाणे करा एक्सप्लोअर, पालकांसोबत घ्या फिरण्याचा आनंद.!

National Parents Day 2024 : व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यात पालकांची भूमिक महत्वाची असते.

Monika Lonkar –Kumbhar

National Parents Day 2024 : आपल्या आयुष्यात आई-वडिलांचे स्थान फार महत्वाचे आहे. आई-वडिलांचे आपल्यावर अनंत उपकार असतात. त्यांच्यामुळे तर आपण स्वत:च्या पायांवर उभे राहायला शिकतो. संगोपनापासून ते प्रेम आणि जिव्हाळ्यापर्यंत व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यात पालकांची भूमिक महत्वाची असते. पालकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि पालकांचे महत्व समजून सांगण्यासाठी दरवर्षी 'राष्ट्रीय पालक दिन' साजरा केला जातो.

जुलै महिन्याच्या चौथ्या रविवारी हा राष्ट्रीय पालक दिन साजरा केला जातो. यंदा हा पालक दिन २८ जुलै २०२४ रोजी साजरा केला जाणार आहे. हा दिवस पालक त्यांचे निस्वार्थ प्रेम आणि त्याग यांना समर्पित आहे. यंदाच्या या पालक दिनानिमित्त तुम्ही तुमच्या पालकांना भारतातील काही प्रमुख ठिकाणी फिरायला नेऊ शकता. कोणती आहेत ती ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

जयपूर

राजस्थानची राजधानी असलेले हे शहर फिरण्यासाठी उत्तम आहे. 'पिंक सिटी' म्हणून या शहराला ओळखले जाते. या शहराला समृद्ध इतिहास लाभला आहे. त्यामुळे, जयपूरमध्ये आल्यावर त्याची झलक तुम्हाला विविध वास्तू, हवेली, राजवाडे, महाल यांच्या स्वरूपात पाहायला मिळते.

Hawa Mahal

तुमच्या आई-वडिलांना हे शहर नक्कीच आवडेल, यात काही शंका नाही. जयपुरमधील हवा महाल, शाही जयगढ किल्ला, नाहरगढ किल्ला इत्यादी ठिकाणे तुम्ही पालकांसोबत फिरू शकता.

संभाजीनगर

महाराष्ट्रातील संभाजीनगर या शहराला पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. संभाजीनगर या शहरात अजिंठा-वेरूळ लेणी आहेत. या लेण्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे.

अजिंठा-वेरूळ लेणी

या लेण्या पाहण्यासाठी जगभरातून असंख्य पर्यटक दरवर्षी संभाजीगनरला येतात. आई-वडिलांसोबत तुम्ही या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.

ऊटी

तामिळनाडू या राज्यातील सुप्रसिद्ध शहर म्हणून ऊटीला ओळखले जाते. हा परिसर येथील उंच पर्वत, चहाचे मळे आणि हिरव्यागार निसर्गासाठी ओळखला जातो.

Ooti

तुम्ही तुमच्या पालकांना ऊटीच्या या सुंदर प्रदेशात फिरायला घेऊन जाऊ शकता. येथील सुंदर बोटॅनिकल गार्डन, सिम्स पार्क आणि ऊटीच्या तलावात बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

वाराणसी

उत्तरप्रदेश या राज्यातील वाराणसी या शहराला 'बनारस' म्हणून ही ओळखले जाते. या शहराला प्राचीन असा इतिहास लाभला आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर हे शहर वसले आहे.

वाराणसी

येथील काशी-विश्वेश्वराचे मंदिर, बनारस घाटावरील गंगा आरती आणि धामिक स्थळांना पालकांसोबत भेट द्यायला विसरू नका. या गंगाघाटावरील आरती जगप्रसिद्ध असून या आरतीचा आवाज लोकांना मंत्रमुग्ध करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Rain-Maharashtra Latest Live News Update: माधुरी हत्तीची देखभाल करण्यासाठी विश्वस्तांच्या उपस्थित जागेची पाहणी

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

होम्बळे फिल्म्सने 'कांतारा: अध्याय 1' मध्ये गुलशन देवय्या यांची 'कुलशेखर' या भूमिकेत केली घोषणा

SCROLL FOR NEXT