ताडगोळ्या sakal
लाइफस्टाइल

ताडगोळ्याचे गुणधर्म

ताडगोळे हे नैसर्गिक पाणी असलेले फळ असल्याने त्याच्या जेलीसारख्या मऊ गरात भरपूर पाणी असते

सकाळ वृत्तसेवा

ताडगोळ्याचे गुणधर्म

आपण मागील भागात ताडगोळ्याबाबत माहिती घेतली. त्याचे गुणधर्म पाहणार आहोत.

  • गुणधर्म

  • जीवाणूवाढीस प्रतिबंध

  • जखम भरणे

  • वेदनाशामक शांत झोपेसाठी

  • भूक वाढू शकते

  • रेचक (बद्धकोष्ठता दूर करू शकते)

  • लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ (शरीरातून पाणी बाहेर टाकू शकते)

  • शरीर हायड्रेट राहते

उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी निघून जात असल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. ताडगोळे हे नैसर्गिक पाणी असलेले फळ असल्याने त्याच्या जेलीसारख्या मऊ गरात भरपूर पाणी असते. सहाजिकच ताडगोळे खाण्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर पाणी मिळते. पाण्याची पातळी नियंत्रित राहिल्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान बिघडत नाही आणि तुम्ही हायड्रेट राहता. शरीर थंड राहण्यासाठी तुम्ही या ताडगोळ्याचे पाणी अथवा ताडगोळ्याचे सरबत नियमित पिऊ शकता. मधुमेही रुग्णही ताडगोळे खाऊ शकतात. हे अत्यंत कमी कॅलरी असणारे फळ आहे.

फायदे ः

व्हिटॅमिन ‘ए’, ‘बी’, आणि ‘सी’सह लोह, झिंक, कॅल्शिअम, फॉस्फरस, थियामाईन आणि रिबोफ्लेविनसारखे व्हिटॅमिन्स असतात.

हे सर्व मिनरल्स प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी गुणकारी ठरते. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. मधुमेहाच्या रुग्णांनी कोवळा ताडगोळा सेवन करावा.

पित्त विकार आणि पोटातील जळजळ दूर होते. पचनशक्ती सुधारते. पोटात गॅस होणे, अपचन, पोटदुखी, जळजळ, बद्धकोष्ठता, मूळव्याध असे त्रास यामुळे कमी होतात.

वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ​

१०० ग्रॅम ताडगोळ्यात केवळ ४० ग्रॅम कॅलरी असते. तसंच ताडगोळा खाल्ल्याने पोट पटकन भरते. यामध्ये पाण्याचे प्रमाण असल्याने जास्त भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास फायदा मिळतो. तसेच वजन कमी करण्यासह पाणी पोटात गेल्याने त्वचाही चांगली राहाते.

नियमित सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे त्वचा सतत चिकट होते. ज्याचा परिणाम त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे, त्वचा लालसर होणे, पिंपल्स येणे, त्वचा काळवंडणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. ताडगोळे खाण्यामुळे त्वचेला पुरेसे पोषण मिळते. पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राहिल्यामुळे घामावाटे त्वचेतील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतो आणि तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने ग्लो करू लागते. सन टॅनपासून वाचण्यासाठी तुम्ही नियमित ताडगोळे खायला हवेत.

उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी कमी होते असल्यामुळे थकल्यासारखे वाटते. ताडगोळ्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित होऊन थकवा कमी होतो.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT