Navratri 2023 esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023 : दसऱ्यादिवशी या किड्याचं दर्शन घडलं तर स्वत:ला नशिबवान समजा, का ते वाचा

वास्तूशास्त्रात महत्त्वाचा असलेला हा किडा घराच्या जवळपास दिसणंच बंद झालंय

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 : आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो. दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात. कारण हा सण वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय होण्याचे प्रतीक आहे.

या दिवशी प्रभू रामाने अहंकारी रावणाचा वध करून माता सीतेची कैदेतून सुटका केली होती. त्यामुळे हिंदू धर्मात दसऱ्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते, ज्यामुळे मनुष्याने रावणाचा म्हणजेच दुष्टतेचा नायनाट करावा, असा संदेश दिला जातो.

दसऱ्याचा दिवस वास्तुच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचा मानला जातो. दसऱ्याला घरात हा किडा दिसला तर तो पाहिल्यानंतर घाबरून जाऊ नका, कारण हे माता लक्ष्मीकडून मिळालेलं शुभ संकेत आहे.

दसऱ्याच्या दिवशी देवी लक्ष्मीची कृपा होते

वास्तुशास्त्रानुसार दसऱ्याचा म्हणजेच विजयादशमीचा दिवस खूप महत्वाचा असून आर्थिक संकटावर मात करण्यासाठी या दिवशी आई लक्ष्मीची पूजा केली जाते. वास्तुनुसार नवमी किंवा दशमीच्या दिवशी जर हे कीटक घरात दिसले तर समजा की माता लक्ष्मी आपली कृपा वर्षाव करणार आहे.

दसऱ्याच्या दिवशी या किड्याचे दर्शन अत्यंत शुभ मानले जाते आणि आपल्या जीवनात येणारे आर्थिक संकट लवकरच दूर होणार असल्याचे संकेत आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणता किडा हे चांगले लक्षण आहे?

दसऱ्याला विंचू दिसणे शुभ असते

वास्तुशास्त्रानुसार नवमी किंवा दशमीच्या दिवशी घरात कुठेही विंचू दिसला तर ते शुभ चिन्ह आहे. सहसा विंचू पाहून लोक घाबरतात, मात्र त्यामागे एक शुभ चिन्ह दडलेले असते. असे म्हटले जाते की दशमीच्या दिवशी विंचू दिसणे म्हणजे आई लक्ष्मी लवकरच आपल्यावर कृपा वर्षाव करणार आहे आणि आपल्याला धन प्राप्ती होणार आहे.

दशमीला घरात विंचू दिसल्यास घाबरू नका किंवा त्यांना कोणतेही नुकसान करू नका. त्याऐवजी तिच्यासमोर हात जोडून माता लक्ष्मीचे स्मरण करा. यानंतर विंचूला नुकसान न होता सुरक्षित ठिकाणी घेऊन जा.

वास्तुशास्त्रानुसार दशमीच्या दिवशी घरात विंचू दिसणे म्हणजे तुमच्या घरात पैशांचा पाऊस पडणार आहे. नोकरी-व्यवसायात ही फायदा होईल. येणाऱ्या काळात तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT